Breaking

Minister Prakash Abitkar : मध्यरात्री अचानक धडकले आरोग्यमंत्री, सुपर स्पेशालिटीमध्ये तारांबळ

Health Minister makes surprise visit to super specialty hospital at midnight : रुग्णालयातील सुविधांचा घेतला आढावा, चांगल्या कामाचे कौतुक

Amravati राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी मध्यरात्री १२.३० वाजता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे अचानक भेट दिली. रुग्णालयातील सुविधा आणि रुग्णांच्या स्थितीचा सखोल आढावा घेतला. त्यांनी वॉर्डांमध्ये फेरफटका मारत रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली तसेच अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत झालेल्या एकूण शस्त्रक्रियांची माहिती घेतली.

सध्या बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागात ३२१ रुग्ण दाखल असून त्यांच्या उपचाराबाबत त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. याशिवाय आतापर्यंत ५१ यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याबद्दल त्यांनी संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले.

Dr. Pankaj Bhoyar : सरकार पाठीशी, पण उत्तम दर्जाची उत्पादनं तयार करा!

मंत्री आबीटकर यांनी किडनी प्रत्यारोपण ICU आणि NICU विभागालाही भेट देऊन आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या अपुऱ्या सुविधांची दखल घेतली. यावेळी रुग्णालयाच्या टप्पा ३ विस्तार प्रकल्पाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडण्यात आला. या प्रकल्पांतर्गत लिव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण आणि हिप रिप्लेसमेंट यांसारख्या शस्त्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

MLA Shweta Mahale : शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांमधून गृहकर्ज द्या!

आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि सर्व तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. या दौर्‍यात आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल ऑफिसर डॉ. निलेश पाचबुद्धे, डॉ. श्याम गावंडे, डॉ. माधव ढोपरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, डॉ. अरुण सोळंके आदी उपस्थित होते.