They will block the road by showing black flags to shameless officials : पाचव्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले
Buldhana : संवेदनशीलता हरवलेल्या आणि निर्लज्ज झालेल्या जिल्हा प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी आझाद हिंदने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद हिंदने जिल्ह्यातील 11 ज्वलंत नागरी समस्यांसाठी 22 मार्चपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्यांसंदर्भात आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर विकासाचे उपआयुक्त, गृह विभागाचे विजय पाटील आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असंवेदनशीलता दाखविली. या निष्क्रीयतेचा निषेध म्हणून आझाद हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांची थट्टा..
उपोषणाच्या पाचव्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. फक्त एका मिनिटाची औपचारिक चर्चा करून मागण्यांचे निवेदन वाचलेही नाही. या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून प्रशासनाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांचा आंदोलनात सहभाग वाढणार..
आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा सहभाग 26 मार्चपासून वाढणार आहे. 48 तासांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे.
Disha Salian Death Case : सत्ताधारी-विरोधकांमध्ये परिषदेत खडाजंगी
उपोषणातील प्रमुख मागण्या..
आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियमानुसार जागा द्यावी. जिल्ह्यातील गहाळ मुलींचा शोध घ्यावा आणि आकडेवारी जाहीर करावी. अवैध धंदे, वाहतूक आणि रेती तस्करी थांबवावी. महिलांसाठी मोफत प्रसाधनगृहे उपलब्ध करावीत. शहरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन सुधारावे.
प्रशासनाची असंवेदनशीलता कायम..
आंदोलनाच्या सहाव्या दिवशीही जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या जागेसंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळेच आझाद हिंदने प्रशासनाविरुद्ध अधिक आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत