Chandrashekhar Bawankule : पालकमंत्री बावनकुळे म्हणाले “हॅलो कलेक्टर”

Chandrashekhar Bawankule inaugurated the War Room and Communication Initiative at Amravati District Collector’s Office : जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम आणि संवाद उपक्रमाचे उद्घाटन

Amravati : शासनाच्या 100 दिवसांच्या कृति कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या “वॉर रूम” आणि “हॅलो कलेक्टर” या संवाद उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या नागरिकांच्या तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने निराकरण करण्यात येणार आहे. नागरिकांना घरबसल्या त्यांच्या समस्या मांडता येणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. हा उपक्रम सतत सुरू राहावा, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले.

अमरावती जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी ठरला, तर राज्यभर याची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. ऑनलाईन तक्रार आणि ट्रॅकिंगची सुविधा यामध्ये करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या तक्रारी व निवेदने नागरिक सादर करतात. यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म, संपर्क क्रमांक, क्यूआर कोड यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Chandrashekhar Bawankule : आता निवडणूक कार्यकर्त्यांची, ५१ टक्क्यांचा संकल्प करा !

तक्रारी प्राप्त होताच त्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत. त्या विहित कालावधीत निकाली काढण्याची जबाबदारी वॉर रूम कक्ष पार पाडेल. तक्रारीची स्थिती पाहण्यासाठी ऑनलाईन ट्रॅकिंग व ई-मेलद्वारे माहिती देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. तक्रार निकाली काढल्यानंतर नागरिक आपला अभिप्रायही नोंदवू शकतील.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा आपल्या मतदारसंघासाठी मोठा निर्णय

या प्रणालीमुळे नागरिकांच्या समस्या कार्यालयात न जाता घरबसल्या सोडवता येणार आहेत. प्रशासन अधिक प्रभावी आणि उत्तरदायी ठरेल, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.