Vijay Wadettiwar : फाईली अडवा, एकमेकांची जिरवा; सरकारची नवी योजना !

 

Congress leader Vijay Wadettiwar’s scathing criticism of the ruling party : सध्या महाराष्ट्रात राजकीय चर्चा व्हावी, अशी परिस्थिती नाही

Nagpur : ज्यावेळी तीन पक्षांचे प्रमुख एकत्र येतात आणि दिल्लीश्वर बॉस उपस्थित असतात. त्याची फार चर्चा होणार नाही. तसेही सध्या महाराष्ट्रात राजकीय चर्चा व्हावी, अशी काही परिस्थिती नाही. आता केवळ एकच परिस्थिती आहे. ती म्हणजे, एकमेकांच्या फाईली अडवा, अन् एकमेकांची जिरवा. जेवढी जिरवता येते तेवढीच जिरवा, अन् लोकांना परेशान करा हा एकमेव धंदा सुरू सुरू असल्याची टिका काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

नागपुरात आज (१२ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आम्ही तुमची फाईल अडवणार नाही. तुम्ही आमची अडवू नका. आम्ही तुमची जिरवणार नाही तुम्ही आमची जीरवू नका, अशी चर्चा बहुतेक सत्ताधाऱ्यांमध्ये झाली असावी. अमित शाह रायगडावर गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नमन करणे हे आता भाजपला उत्तम जमते आहे. कारण चलो चले मोदी के साथ छत्रपती का आशीर्वाद, त्या आशीर्वादासाठी ते कदाचित जात असतील. पण आशीर्वाद मिळाला की महाराजांना विसरू नये म्हणजे झालं, असेही ते म्हणाले.

शिवसेना उबाठाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून काँग्रेसवर टिका करण्यात आली. याबाबत विचारले असता, सामनाची टीका निरर्थक आहे. तो काही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा कार्यक्रम नव्हता. तो काँग्रेस पक्षाचा मेळावा होता. परंतु सामनाचे लेखक किंवा संपादकांच्या मनात काय आहे, याचा मी आज अंदाज घेऊ शकत नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar : पैशांसाठी अडून बसणारे मंगेशकर कुटुंबीय, वडेट्टीवारांचा पुन्हा हल्लाबोल !

शिक्षण विभागातील घोटाळ्याबाबत विचारले असता, हे प्रकरण सहा-सात वर्षांपूर्वीचा आहे. याला मान्यता दिली होती. उपसंचालकांपर्यंत कसं प्रकरण गेलं, ते मला माहिती नाही, पण शिक्षणाधिकारी कार्यालयातून आयडी जनरेट केला जातो. तिथपर्यंतचा सगळा प्रवास जो असतो, तो त्या फायलींमधून जात असतो. उपसंचालकांचा अधिकार केवळ पगार सुरू करण्यापुरता असतो. पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने चालला आहे, त्याची माहिती घेत आहोत आणि त्यात काही गैरप्रकार झाले असतील. तर त्यात जो जो सहभागी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी राहील.

Vijay Wadettiwar : सरकार म्हणून आता तरी जागे व्हा !

माणिकराव कोकाटे दिलदार शेतकरी असू शकतात. त्यात काही वाईट नाही. परंतु भीक मागायची पाळी सरकारने आणली आहे, हे सरकारचं पाप आहे. माणिकराव कोकाटे हे दिलदार व्यक्तीच आहेत. त्यांना कशाचीही चिंता नाही. आता त्यांना शेवटची वॉर्निंग देण्यात आली आहे. तिसरी चूक झाली आहे, चौथी चूक झाली तर अजित दादा या दिलदार शेतकऱ्याला शेती करायला पाठवतील का, हा प्रश्न त्यांच्याकडे विचारू, असे वडेट्टीवार म्हणाले.

Congress’s agitation : गडचिरोली वैनगंगा नदी पात्रात काँग्रेसचे आंदोलन !

संजय राऊत यांनी केलेल्या टिकेबद्दल ते म्हणाले, आम्हाला अपयश आले तर त्यांना कुठे यश मिळालं? जबाबदारी एका पक्षावर ढकलत असताना आपलीही जबाबदारी आहे, हे विसरू नये. आघाडी म्हणून लढलो, हे आघाडीचे अपयश आहे. म्हणून याची जबाबदारी आघाडीने स्वीकारली पाहिजे, कोणावरही टीका करून स्वतःचा बचाव करणे योग्य नाही, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.