व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या एक वर्ष शांतता भंग करायची नाही, कोर्टाने दिली अभिजित दिपकेंना तंबी

एक वर्ष शांतता भंग करायची नाही, कोर्टाने दिली अभिजित दिपकेंना तंबी

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची सुटका, आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता

New delhi मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँक्रेच जनता पार्टी’च्या वतीने दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. या आंदोलनासाठी पक्षातर्फे जोरदार तयारी केली जात असतानाच, पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके व त्यांच्या साथीदारांना दिल्लीत दाखल होताच विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, शनिवारी अटक करण्यात आलेल्या दिपके व त्यांच्या साथीदारांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन देताना न्यायालयाकडून त्यांच्यावर पुढील एक वर्ष शांतता भंग करणार नाही अशी महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. या न्यायालयीन अटीमुळे आता काँक्रेच जनता पार्टीचे कार्यकर्ते पुढील काळात काय पावले उचलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपची ‘टाईट फिल्डिंग’; अनिल सोले यांच्या बंडखोरीमुळे नागपूर पदवीधर निवडणुकीत राजकीय रंगत वाढली

काँक्रेच जनता पार्टीचे जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी केंद्र सरकारने आणि प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली होती. आंदोलनासाठी दिल्लीत कोणीही येऊ नये म्हणून दिल्लीकडे येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध आले होते. इतकेच नव्हे तर दिल्ली मेट्रोची काही सेवाही बंद ठेवण्यात आली होती. दिल्लीत ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे हे आंदोलन थोपवण्यात केंद्र सरकारला यश आले असले, तरी या दडपशाहीमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता न्यायालयीन जामीन मिळाल्यानंतर अभिजित दिपके आणि त्यांचे कार्यकर्ते पुढील रणनीती कशी आखतात, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!