Acb trap : मोठी कारवाई! परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

beed-parli-tehsildar-vyankatesh-munde-acb-trap-bribe-solvency-certificate : प्रमाणपत्रासाठी ५० हजारांची मागणी केल्याचा आरोप

Beed : राज्यात लाचलुचपतविरोधी कारवाया वेग घेत असताना आता बीड जिल्ह्यातील परळी येथे तहसीलदारच एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना समोर आली आहे. परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप असून या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराला सॉल्व्हन्सी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी तहसील कार्यालयात पाठपुरावा सुरू असताना व्यंकटेश मुंडे यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगितले जाते. चर्चेनंतर ही रक्कम २० हजार रुपयांवर ठरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

Crime in Nagpur: नागपूरच्या किदवई हायस्कूलमध्ये खळबळ; मुख्याध्यापकाचा शिक्षकावर चाकूने हल्ला

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. रंगेहात पकडण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. मात्र, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदारांनी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जाते. तरीदेखील एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Farmers Suicide : सावकारीच्या जाचाने शेतकऱ्याचा बळी, दीड लाखांच्या बदल्यात २० लाखांची मागणी

अलीकडेच मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांवर तसेच मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईनंतर ही घटना उघडकीस आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. एसीबीच्या वाढत्या धाडींमुळे सरकारी कार्यालयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचे काम वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी शासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपासानंतर अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.