Including educational institutions of Danve, Munde, Sule, Tope : दानवे, मुंडे, सुळे, टोपे यांच्या शिक्षण संस्थांचा समावेश
Chhatrapati Sambhajinagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एक धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेत पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवणाऱ्या अनेक महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया थांबवले आहे. यामध्ये थेट मंत्र्यांपासून माजी मंत्र्यांपर्यंत अनेक राजकीय नेत्यांच्या शिक्षण संस्थांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाच्या निर्णयानुसार, भौतिक सुविधा नसलेल्या आणि ‘नॅक’ मूल्यांकन न झालेल्या 113 महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवण्यात आले आहेत.
विद्यापीठाच्या विद्यापरिषद आणि व्यवस्थापन परिषदेने यापूर्वीच ठरवले होते की, ‘नॅक’ मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू ठेवू दिले जाणार नाहीत. पण काही महाविद्यालयांनी ‘नॅक’ बंद असल्याचे कारण देत शासनाकडे मुदतवाढ मागितली होती. शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतरही अनेक संस्थांनी भौतिक सुविधा व प्राध्यापकांची नियुक्ती केली नव्हती.
विद्यापीठाच्या तीन सदस्यीय समितीने संबंधित महाविद्यालयांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या. काही महाविद्यालयांनी प्राध्यापकांची कागदोपत्री नियुक्ती केली, पण त्यांना पगार दिला जात नव्हता.काही ठिकाणी बायोमेट्रिक हजेरीसुद्धा नव्हती. अनेक महाविद्यालयांकडे आवश्यक प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि ग्रंथालय यांसारख्या भौतिक सुविधा नव्हत्या.
Gulabrao Patil : ‘कुठलंच बिल प्रलंबित नाही’ मंत्री गुलाबराव पाटील यांचा इन्कार
प्रवेश थांबवण्यात आलेले महाविद्यालय त्याचे मालक नेते आणि संस्था, हरिभाऊ बागडे यांचे संत सावतामाळी महाविद्यालय, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आर.पी. महाविद्यालय, धाराशिव
पंकजा व धनंजय मुंडे यांचे वैजनाथ महाविद्यालय, परळी
रावसाहेब दानवे यांचे मोरेश्वर महाविद्यालय, भोकरदन
सुप्रिया सुळे यांची मौलाना आझाद शिक्षण संस्था, पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, प्रकाश साळुंके यांच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची 5 महाविद्यालये
राजेश टोपे यांची मत्स्योदरी शिक्षण संस्था, जालना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची आदर्श शिक्षण संस्था, बीड बसवराज पाटील यांचे माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम माजी मंत्री
राणा जगजितसिंह यांचे तेरणा महाविद्यालय, धाराशिव तसेच
मधुकर चव्हाण नळदुर्ग महाविद्यालय, धाराशिव या महाविद्यालयांना स्थगिती देण्यात आली आहे.
Bachhu kadu: प्रहार संघटनेचे राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
विद्यापीठाने हे स्पष्ट केले आहे की, महाविद्यालयांनी आवश्यक भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात शिस्त आणि गुणवत्ता याला प्राधान्य दिलं गेलं आहे, असं मानलं जात आहे.