Breaking

Adv. Prakash Ambedkar : युद्धबंदीची माहिती प्रथम अमेरिकेकडूनच का?

Why did the ceasefire announcement come from America? : केंद्र सरकारवर प्रकाश आंबेडकरांचा सवाल; युद्धबंदी मागे अमेरिकेचा दबाव?

Akola भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीची माहिती भारतीय जनतेला सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच का मिळाली? पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून ती माहिती का देण्यात आली नाही? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला केला आहे.

“या संघर्षात भारताचा वरचष्मा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमिक ब्रिफिंगवरून स्पष्ट झाले होते. पाकिस्तानने एकतर्फी हल्ला केला असताना, आपण अमेरिकेचे ऐकले आणि युद्धबंदीस सहमती दिली. ही सहमती भारताच्या अटींवर झाली, की अमेरिकेच्या दबावामुळे?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Separate Vidarbha State : पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाचा नारा, यात्रा निघणार!

आंबेडकर म्हणाले, “अमेरिका पाकिस्तानला वाचवू इच्छित होती आणि त्यांच्यावरचा विश्वास टिकवून ठेवण्याच्या हेतूने भारतावर युद्धबंदीचा दबाव टाकण्यात आला. चीनसह अन्य जागतिक शक्तींशी धोरणात्मक भागीदारी करून पाकिस्तानने अमेरिकेवरील आपले अवलंबित्व कमी केले असले, तरी या संघर्षात अमेरिका पुन्हा पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली.”

ते पुढे म्हणाले, “संघर्षाच्या काळात चीनने पाकिस्तानला कोणतीही आपत्कालीन शस्त्रास्त्रे पुरवलेली नाहीत. त्यामुळे पाकिस्तानला तुर्कीवर अवलंबून राहावे लागले. हे लक्षात घेता अमेरिका ही संधी मानून पुढे सरसावली आणि युद्धबंदीची मध्यस्थी करत पुन्हा पाकिस्तानला मदतीचा हात दिला.”

“राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर केलेली पोस्ट भारतासाठी अत्यंत चिंताजनक आहे. त्यांनी दोन मुद्द्यांवर भाष्य केले—काश्मीरवर तोडगा आणि पाकिस्तानसोबत व्यापार वाढवणे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मीरचा उल्लेख करणे आणि त्या माध्यमातून त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे, हे गंभीर बाब आहे,” असेही आंबेडकर यांनी नमूद केले.

Akash Fundkar : नागपुरात लवकरच जागतिक दर्जाचे वेल्डिंग इन्स्टिट्यूट

“पाकिस्तानसोबत व्यापार वाढवून अमेरिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पाकिस्तानला मजबूत बनवत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला पाकिस्तान सीमापार दहशतवादाला अधिक बळकटी देईल. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे अपयश दर्शवते,” अशी टीका करत आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले.