व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Agricultural Service Centres : खत विक्रीतील गैरप्रकार भोवला; आठ कृषी केंद्रांचे परवाने...

Agricultural Service Centres : खत विक्रीतील गैरप्रकार भोवला; आठ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Irregularities in fertilizer sales exposed; licences of eight agri centres suspended : खरीपपूर्वी प्रशासनाचा धडक निर्णय; नियमभंग करणाऱ्यांना इशारा

Buldhana जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्रांमध्ये रासायनिक खत विक्रीत अनियमितता होत असल्याचे उघड झाल्यानंतर कृषी विभागाने धडक कारवाई करत आठ केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित केले आहेत. तसेच दोन कृषी केंद्र संचालकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी संतोष डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. कृत्रिम खतटंचाई निर्माण करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. त्यानुसार कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली.

Makrand Jadhav-Patil : बुलढाणा जिल्ह्यासाठी ३७ कोटी १५ लाखांचा निधी!

या तपासणीत अनेक ठिकाणी नियमभंग आढळून आला. अनुदानित रासायनिक खतांची विक्री करताना ई-पॉस मशीनवर खरेदीदार शेतकऱ्यांची नोंद करणे आणि पक्के बिल देणे बंधनकारक असताना काही परवानाधारकांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. तसेच साठा पुस्तके अद्ययावत न ठेवणे, देयकांवर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसणे आदी त्रुटी आढळल्या.
या सर्व बाबी लक्षात घेऊन खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर दोन केंद्र संचालकांना कडक इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व परवानाधारक खत विक्रेत्यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!