Mourning for crashed plane ; what exactly happened : लंडनला निघालेल्या अपघातग्रस्त विमाना बाबत सर्वत्र शोक!
Ahmedabad: लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमान दुर्घटनेबाबत सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. एअर इंडियाने अपघाताबाबत दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, विमानातील 242 प्रवाशांपैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाचा नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला. अहमदाबादमधील मेघनानी नगर भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. विमानात 242 प्रवासी होते. हे विमान अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात होते. विमान एका निवासी भागात कोसळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच विमानाला अपघात झाला. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर एअर इंडियाने हॉटलाइन नंबर जारी केला आहे.
Plane crash in Ahmedabad : 232 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!
एअर इंडियाच्या विमान AI171 ला अपघात झाला, हे विमान बोईंग B787 VT-ANB प्रकाराचे होते. अपघाताची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही अहमदाबादला रवाना झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गुजरातचे मुख्यमंत्री आणि अहमदाबादच्या आयुक्तांशी फोनवर बोलून त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली आहे. तसेच गृहमंत्र्यांनी सर्वतोपरी मदत करण्याबाबत सांगितले. एअर इंडिया पण परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
एअर इंडियाने माहिती देण्यासाठी हॉटलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जारी केला आहे. दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये सर्व तपशिलांचे समन्वय साधण्यासाठी एक ऑपरेशनल कंट्रोल रूम सक्रिय करण्यात आली आहे. त्याचा क्रमांक आहे: ०११-२४६१०८४३ | ९६५०३९१८५९.
अहमदाबादच्या उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान डॉक्टर्स हॉस्टेलवर कोसळल्याचे समोर आले आहे. माहिती मिळताच दोन-तीन मिनिटांत पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. जवळपास 70-80 टक्के क्षेत्र मोकळे झाले आहे. सर्व एजन्सी कामात व्यस्त आहेत.
Maharashtra Navnirman Sena : महापालिकेच्या झोन कार्यालयात मटण मार्केट लावू, मनसेचा इशारा
विमानात प्रवाश्यांशिवाय दोन पायलट आणि 10 केबिन क्रू सदस्य होते. कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे विमान उडवत होते. विमानाने अहमदाबाद विमानतळाच्या रनवे 23 वरून दुपारी 1:38 वाजता उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच वैमानिकाने एटीसीला मेडे कॉल केला, परंतु एटीसीने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विमानाने उड्डाण करताच ते विमानतळाच्या बाहेर पडले, त्यानंतर धुराचे प्रचंड ढग दिसले. विमान अपघातानंतर एनडीआरएफच्या अनेक पथकांना मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते, असा दावा केला जात आहे.