Breaking

Ajit Pawar: ‘ नेमका कुठला निधी मिळाला नाही मी त्याला विचारतो,’

Ajit Pawar directly spoke on Datta Bharnes statement : दत्ता भरणेंच्या वक्तव्यावर अजित पवारांनी थेटच सांगितले

Pune : दत्ता भरणे माझा सहकारी आहे. माझ्या मंत्रिमंडळात आहे. नेमका कोणता निधी मिळाला नाही हे मी त्याला विचारतो. कुठल्या अर्थाने त्यांनी हे वक्तव्य केले. हे त्यांना विचारून सांगतो, असे थेट उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांना पुरेसा निधी मिळत नाही. असा आरोप अजित पवार गटाचे मंत्री दत्ता भरणे यांनी केला होता. यावर बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले.

महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कायम वेगवेगळ्या चर्चेत असते. या योजनेवर आता स्वतः सत्ताधारी गटातीलच आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याच्या या योजनेसाठी अन्य विकासकामांचा निधी वळवला जात असल्याचा आरोप अजित पवार गटातील मंत्र्यांकडून समोर आला. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका जाहीर कार्यक्रमात या योजनेबाबत टिप्पणी आणि निधीबाबत थेट आरोपच केला.

Ladki bahin yojna ; राजकीय वादाचा विषय बनली ‘लाडकी बहीण योजना’

विकास निधी वेळेवर मिळत नाही, कारण तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातो. या वक्तव्यावरती अजित पवार म्हणाले, मी त्याला विचारतो. तो माझा सहकारी आहे. मंत्रिमंडळात आहे. नेमका कुठला निधी मिळाला नाही आणि कुठल्या अर्थानं ते बोलले हे त्यांना विचारून सांगतो अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. भरणेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप, प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

MLA Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक प्रस्तावावर जागतिक मोहोर!

काही सत्ताधारी नेत्यांनी भरणेंच्या वक्तव्याला वैयक्तिक मत ठरवत योजनेचे समर्थन केले. दरम्यान, लाडकी बहीण ही योजना राज्यातील अनेक महिलांना आर्थिक आधार देणारी ठरली आहे. मात्र, योजनेसाठी इतर विकास योजनांचा बळी जात असेल, तर त्यावर गंभीर पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह ही पाहायला मिळत आहे.