Ajit Pawar Quips: That’s Why I Became Deputy CM Six Times : दर कॅबिेनेटमध्ये विदर्भासाठी काही ना काही करत असतो
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. काल नागपुरात झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय चिंतन शिबिरात त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला. काम करणाऱ्यांचे कौतुक केले, तर पार्ट टाईम काम करून मिरवणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. अजित पवार सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यामागचे कारण त्यांनी काल शिबिरात सांगितले.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काल (१९ सप्टेंबर) मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रात चांदा ते बांदा विकास व्हावा, अशी आमची भूमिका आहे. विदर्भासाठी दर कॅबिनेटमध्ये आम्ही काही ना काही सकारात्मक करत असतो. राज्याची उपराजधानी नागपूर येथे चिंतन शिबिर घ्यावे, अशी मागणी होती, ती आम्ही पूर्ण केली. सर्वात महत्वाचे म्हणजे पक्ष आहे आणि पक्षाने संधी दिली म्हणून मी तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे प्रत्येकानेच पक्षासाठी इमानेइतबारे काम केले पाहिजे. फ्लॅश मारणाऱ्यांना बाजुला सारायला आम्हाला वेळ लागणार नाही.
Lathi charge : अंतरवाली लाठीचार्जचा आदेश कुणी दिला सगळ्यांनाच माहिती आहे !
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या अंतरवली सराटी येथील आंदोलनाच्या मागे राजेश टोपे यांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहभाग आहे, असा आरोप होतो आहे. छगन भुजबळ यांनीही तसा आरोप केला आहे. पण यासंदर्भात माझ्याकडे काही माहिती नाही. पण अंतरवली सराटीमध्ये जे काही घडले, त्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्या माहितीवरून सर्व परिस्थिती स्पष्ट होते, असे अजित पवार यांनी सांगितले.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पचा भारतावर नवा प्रहार, विद्यार्थ्यांचे स्वप्न धुसर !
प्रफुल पटेल यांनीही यावेळी कार्यकर्त्यांची चांगलीच झडती घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पक्षात टाईमपास करणारे लोक खपवून घेतले जाणार नाहीत. यावर मी माझी भूमिका मांडली आहे. पक्षाला वेळ द्यावा आणि गांभीर्याने काम करावे, असेही अजित पवार म्हणाले.








