Ajit Pawar : ‘हाच का दादाचा वादा?, पुण्यात झळकले बॅनर

Banners questioning the deputy chief minister : अजित पवारांना प्रश्न विचारणारे लोक कोण, राष्ट्रवादीपुढे प्रश्न

Pune पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट प्रश्न विचारणारे बॅनर्स लावण्यात आले असून, या बॅनर्समुळे निवडणुकीतील चर्चेला नवे वळण मिळाले आहे. “हाच का दादाचा वादा” या ठळक शीर्षकाखाली लावण्यात आलेल्या या बॅनर्समध्ये अजित पवार यांना थेट प्रश्न विचारले गेले आहेत.

या बॅनर्समध्ये विचारण्यात आले आहे की, “अजित दादा तुम्ही प्रभाग क्रमांक ९ मध्ये पैसे वाटणार्‍यांचा प्रचार करणार का?” “अजित दादा तुम्ही प्रभाग क्रमांक ९ मध्ये जमिनी लाटणार्‍यांचा प्रचार करणार का?” “अजित दादा तुम्ही प्रभाग क्रमांक ९ मध्ये अवैध धंदे करणार्‍यांचा प्रचार करणार का? हाच का दादाचा वादा?” या प्रश्नांमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. बॅनर्समध्ये पुढे असेही लिहिले आहे की, “दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे परंतु प्रचंड नाराज असणारे प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व मतदार.”

Thane Municipal Elections : निवडणूक अर्ज मागे घेताना नेमकं काय घडलं?, मनसेने घेतला शोध

या बॅनर्समुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून, त्यांची प्रतिमा विकासाभिमुख नेत्याची आहे. मात्र, या बॅनर्समधून स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रचारातील काही निर्णयांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याआधी अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट दिल्याने वाद निर्माण झाला होता.

PMC election: एकाच घरातून पती-पत्नी, आई-मुलगा, भाऊ-भाऊ अशा १२ हून अधिक जोड्या रिंगणात

पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीत विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षाला बळ मिळत आहे. मात्र, प्रभाग क्रमांक ९ मध्ये लावण्यात आलेल्या या बॅनर्समुळे पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक मतदारांच्या नावाने हे बॅनर्स कोण झळकावले असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून पुण्यात राष्ट्रवादीच्या विरोधकांनीच हे बॅनर्स लावले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.