Ajit Pawar death news : मेट्रोपासून अष्टविनायक मार्गापर्यंत दादांच्या कामांचा ठसा!

Pune can never forget Ajit Dada’s contributions in development : केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष कृती; अजितदादांनी दिलेले योगदान पुणेकरांच्या विस्मरणात जाणे अशक्य

Pune उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांनी पुण्याच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राबवलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प यांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी केवळ निधीची तरतूद केली नाही, तर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनावर वचक ठेवून पुण्याला जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा मिळवून दिल्या.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजितदादांनी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला. मेट्रोचे विविध टप्पे वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक स्तरावर लक्ष दिले. याशिवाय, शहराभोवतीचा रिंग रोड, उड्डाणपूल आणि अंडरपास यांच्या जाळ्यामुळे पुण्यातील कनेक्टिव्हिटी सुधारली. पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वे आणि पुरंदर विमानतळ यांसारख्या प्रकल्पांसाठी त्यांनी मांडलेली दूरदृष्टी पुण्याच्या व्यावसायिक भविष्यासाठी पायाभरणी ठरली आहे.

Ajit Pawar Death News : अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाजार समित्या ‘मौन’; लिलाव आणि व्यवहार आज पूर्णपणे बंद

पुण्यातील प्रशासकीय कार्यालयांना कॉर्पोरेट दर्जा मिळवून देण्याचे श्रेय दादांना जाते. नवे जिल्हाधिकारी कार्यालय, व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, सारथी, नोंदणी भवन, आणि पोलीस आयुक्तालय यांसारख्या इमारती त्यांच्या कार्यकाळात उभ्या राहिल्या. पुण्यातील पहिली ‘ग्रीन बिल्डिंग’ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली साकारली. या इमारतींना मिळालेली ‘फाईव्ह स्टार’ श्रेणी त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाची साक्ष देते.

हिंजवडी आयटी पार्कसह पुण्यातील औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर दादांनी नेहमीच तत्परतेने निर्णय घेतले. ट्रॅफिक, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाला दिलेले आदेश आणि वेळोवेळी केलेली पाहणी यामुळे शहरात परकीय गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या.

Ajit pawar: मला कंटाळा आलाय, आता थांबावं वाटतंय !

 

भाविकांसाठी अजितदादांनी केलेले काम अत्यंत महत्त्वाचे आहे. अष्टविनायकाची आठही ठिकाणे एका दिवसात पाहणे शक्य व्हावे, यासाठी त्यांनी अष्टविनायक मार्गांचे दुपदरीकरण केले. खड्डेविरहित रस्ते आणि उत्तम नियोजनामुळे आज लाखो भाविकांचा प्रवास सुखाचा झाला आहे.

वाढत्या पुण्याची तहान भागवण्यासाठी जलसंपदा व्यवस्थापनावर त्यांनी विशेष भर दिला. पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि जलसंधारणाचे प्रकल्प राबवून त्यांनी नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. तसेच शिक्षण क्षेत्रात ‘सारथी’ सारख्या संस्थांना ताकद देऊन त्यांनी उपेक्षित घटकांसाठी प्रगतीची दारे खुली केली.