Distribute money to the scheme beneficiaries immediately : निराधार आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांचे पैसे तातडीने वितरित करण्याचे निर्देश
Amravati संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यामधील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य शासनाने तातडीने निधी वितरित करावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांनी आज दिले.
पवार यांनी रविवारी अमरावतीमध्ये विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.
योजनेतील अंमलबजावणीत केंद्र सरकारच्या निधीच्या प्रतीक्षेमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे राज्याने स्वतःचा निधी वापरून लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत थेट लाभ जमा करावा, असेही पवार यांनी सांगितले. डीबीटी प्रक्रियेत अडचणी येत असल्यास आधार जोडणी तातडीने पूर्ण करावी. निधी वितरणासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती, त्यामुळे उर्वरित निधी तातडीने वितरित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
Maharashtra Din : झेंडावंदनाला २१ कर्मचाऱ्यांनी मारली दांडी, कारवाई होणार
स्वस्त धान्य योजनेत पात्र लाभार्थ्यांची यादी करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा. धान्य वितरण करताना मेळघाटसारख्या आदिवासी भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.
जिल्हा नियोजनातून पोलिस विभागासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून आवश्यक वाहने व साहित्य खरेदी करण्यात यावे. गेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात चांगली कामगिरी होत आहे. त्यात सातत्य राखावे व नियोजित कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एल्गार, SDO कार्यालयावर धडकले!
अमरावती विमानतळाची धावपट्टी वाढविणे आणि रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश त्यांनी दिले. सारथी संस्थेच्या इमारतीसाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जून २०२६ पर्यंत बांधकाम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या ठिकाणी भोजन व्यवस्था, वाहनतळ व कामगार निवासाची सुविधा असावी, यासाठीही निर्देश देण्यात आले.