25 thousand new party workars will join Ajit Pawar NCP : खामगावात शक्तिप्रदर्शन मेळावा; अजित पवारांसह ९ मंत्र्यांची उपस्थिती
Khamgao उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य संकल्प मेळावा व पक्षप्रवेश सोहळा गुरुवार, १२ जून २०२५ रोजी खामगाव येथे पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता नगर परिषद मैदानात हा मेळावा होणार आहे. यावेळी सुमारे २५ हजार नवे कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या मेळाव्यास अजित पवार DCM Ajit Pawar यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री, खासदार, आमदार व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, खामगावचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह अनेक आजी-माजी स्थानिक प्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यावेळी पक्षप्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खामगाव संकल्प मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर झेंड्यांनी तिरंगामय झाले आहे. प्रमुख चौकांमध्ये नेत्यांचे कटआऊट्स, विद्युत रोषणाई व डिजीटल फलकांनी शहरात राजकीय वातावरण निर्माण झाले आहे.या सोहळ्याच्या निमित्ताने खामगाव मतदारसंघात पक्षाचे ११ हजार सक्रिय सदस्यांची नोंदणीही करण्यात आली असून, त्यांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्त केली जाणार आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे,जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.
Smart City project : डिसेंबरपर्यंत पूर्ण करा स्मार्ट सिटीचे प्रकल्प
दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुंबईचे प्रसिद्ध कलाकार अजय साटम यांचा ६० जणांचा संच सहभागी होणार आहे. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना २५ हजार भिंतीवरील घड्याळ आणि पक्षचिन्ह असलेल्या ५ हजार छत्र्या भेट म्हणून देण्यात येणार आहेत.








