व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Ajit Pawar NCP : गुन्हेगारच कसे करतील ‘गुन्हेमुक्त पुणे’?

Ajit Pawar NCP : गुन्हेगारच कसे करतील ‘गुन्हेमुक्त पुणे’?

Ajit Pawar’s candidates have criminal backgrounds : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवारांवरून वाद

Pune पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांच्या यादीवर अंडरवर्ल्डशी संबंधित वाद निर्माण झाला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “गुन्हेमुक्त पुणे” या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून निकाल १६ जानेवारीला जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आघाडीने एकत्र लढणार आहेत. मात्र उमेदवारांच्या यादीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना तिकीट दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंडेकर कुटुंबातील काही सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुर्यकांत उर्फ बंदू अंडेकर यांच्या कुटुंबातील सोनाली अंडेकर आणि लक्ष्मी अंडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. हे सध्या आयुष कोमकर खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्यांना प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच गँगस्टर गजानन मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे, तर बापू उर्फ ​​कुमार प्रभाकर नायर यांनी पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ३९ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत पिंटू धावडे आणि रोहिदास चोरगे यांनाही उमेदवारी मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Raj Thackeray : माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही !

 

उमेदवारांच्या यादीत गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित उमेदवारांचा समावेश झाल्याने विरोधकांनी टीका केली आहे. अजित पवार यांनी पूर्वी “गुन्हेमुक्त पुणे” अशी घोषणा दिली होती. मात्र उमेदवारांच्या यादीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा समावेश झाल्याने त्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या वादामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावरही नागरिकांनी यावर प्रतिक्रिया दिली असून अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठवली जात आहे. नागरिकांनी विचारले आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊन गुन्हेमुक्त पुणे कसे शक्य होणार?

PMC Elections : मनसेने दिली सर्वांत श्रीमंत महिला उमेदवार

मात्र पक्षाचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी य अघटनेचे समर्थन केले आहे. “या उमेदवारांनी यापूर्वी पक्षाकडून नगरसेवक म्हणून काम केले आहे आणि त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जात आहे. त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळात कोणताही गैरप्रकार घडला नाही. त्यांच्या कामामुळेच लोकांनी त्यांना निवडून दिले होते. महिला उमेदवारांनी स्थानिक पातळीवर चांगली कामगिरी केली आहे, म्हणूनच त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे,” असे पासलकर यांनी माध्यमांना सांगितले.

error: Content is protected !!