Ajit Pawar NCP : अजितदादांचे ‘चिंतन’ नागपूरच्या वाहतुकीस ठरतेय अडथळा!

Wooden arch gateways are becoming an obstacle for traffic : शिबीर आटोपून चार दिवस झाले तरी प्रवेशद्वाराच्या कमानी उभ्याच

Nagpur  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक निवडणुकांपूर्वी आढावा घेण्यासाठी नागपुरात चिंतन शिबीर घेतले. यामध्ये विर्भात राष्ट्रवादीचा व्याप वाढविण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले. याला आता चार दिवस झाले आहेत. अजितदादा शिबीर घेऊन निघून गेले, पण त्यांच्या स्वागतासाठी लागलेले प्रवेशद्वार अद्याप तसेच आहेत. अत्यंत वर्दळीच्या अश्या वर्धा मार्गावर वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिपथात आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विशेषतः महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादीने नागपुरात चार दिवसांपूर्वी चिंतन शिबीर घेतले. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने हे शिबीर झाले. शिबिरात अजितदादांनी विदर्भातील संघटनेच्या बांधणीला जास्त महत्त्व देण्याचा निर्धार व्यक्त केला.

DPC Meeting : ठाकरे सेना धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर!

पण शिबीर झाल्यानंतर त्यांचे विमान मुंबईत लँड होण्यापूर्वीच नागपूरच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने राजीनामा दिला. बाबा गुजर यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीला पहिला मोठा धक्का बसला. हा धक्का पचवत नाही, तोच यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष क्रांती पाटील कमारकर यांनी राजीनामा सादर केला. त्यामुळे दादांच्या पक्षाचे भवितव्य तसेही अधांतरीच आहे.

OBC Reservation : आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका, आरक्षणासाठी लढू

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुलाबी रंगाचे मोठमोठाले प्रवेशद्वार अजित पवार यांच्या स्वागतासाठी उभारले. त्यातील एक प्रवेशद्वाराची कमान वर्दळीच्या अशा वर्धा रोडवर आहे. छत्रपती चौक ते रॅडिसन हॉटेलदरम्यान ज्या ठिकाणी दररोज वाहतूक खोळंबते त्याच ठिकाणी ही कमान आहे. शिबीर आटोपून चार दिवस झाले तरीही कमानी काढलेल्या नाही.

याच ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्समुळे अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत होती. अखेर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी ट्रॅव्हल्सला थांबण्यास मनाई केल्यामुळे प्रश्न सुटला आहे. पण आता त्याचठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची कमान उभी असल्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. यावर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलेलं आहे.