ajit-pawar-plane-crash-investigation-update-dfdr-cvr-report : तांत्रिक बिघाड की घातपात? सत्य शोधण्यासाठी AAIB कडून अमेरिकेच्या ‘हनीवेल’ची मदत
New Delhi अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीने आता निर्णायक वळण घेतले आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या भीषण दुर्घटनेचा तपास करणाऱ्या ‘विमान अपघात तपासणी ब्युरो’ने (AAIB) महत्त्वाची तांत्रिक प्रगती केली आहे. विमानाचा डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (DFDR) यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आला असून, त्यातून विमानाची उंची, वेग आणि इंजिनची स्थिती याबद्दलची महत्त्वाची माहिती समोर येणार आहे.
CVR च्या दुरुस्तीसाठी तांत्रिक पेच अपघाताच्या वेळी विमानाला लागलेल्या भीषण आगीमुळे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) गंभीररीत्या खराब झाला आहे. वैमानिकांचे शेवटच्या क्षणाचे संभाषण या यंत्रात कैद असते. हा डेटा मिळवण्यासाठी आता ‘हनीवेल’ (Honeywell) या मूळ उत्पादक कंपनीची मदत घेतली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे युनिट अमेरिकेतील प्रयोगशाळेत पाठवण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून त्यातील ऑडिओ फाईल्स रिकव्हर करता येतील.
Rane Vs Raut : नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा मानहानी दावा
एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडून माहिती संकलित ताज्या अपडेटनुसार, तपास यंत्रणांनी पुणे आणि मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील त्या दिवशीचे रडार फुटेज आणि ऑडिओ लॉग ताब्यात घेतले आहेत. विमानाने बारामतीकडे झेप घेतल्यानंतर शेवटच्या ५ मिनिटांत विमानाचा मार्ग अचानक का बदलला, याचा तांत्रिक आराखडा (Flight Path Analysis) तयार केला जात आहे.
जय पवार यांच्या शंकांमुळे चौकशीवर दबाव अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी या अपघाताच्या परिस्थितीवर उपस्थित केलेल्या शंकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. “विमानाची नियमित देखभाल होत असताना अचानक असा अपघात होणे संशयास्पद आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यामुळेच केंद्र सरकारने या तपासात पारदर्शकता ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या (ICAO) मानकांचा आधार घेतला आहे.
Bhiwandi mayor election : भाजपला मोठा धक्का; नारायण चौधरींनी बंडखोरी करत मिळवलं महापौरपद
३० दिवसांत प्राथमिक अहवाल
DFDR विश्लेषण: नवी दिल्लीतील प्रयोगशाळेत विमानाचा तांत्रिक डेटा डिकोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
विशेष ऑडिट: ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेले व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल लवकरच AAIB कडे सुपूर्द केला जाईल.
प्राथमिक अहवाल: नियमानुसार, २८ फेब्रुवारीपर्यंत अपघाताचा प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर केला जाण्याची शक्यता आहे.








