Internal squabbles within party over Anjana Krishna case highlighted : अंजना कृष्णा प्रकरणावर पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांवरही टोला
Mumbai : अवैध मुरूम उत्खनन प्रकरण राज्याच्या राजकारणाला चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. अजित पवारांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांच्यावर जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून काकांच्या बचावासाठी उघडपणे भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणात झालेला गैरसमज हा अजित पवारांच्या हिंदी आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला. मात्र, दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षांकडून मुद्दाम मीडिया ट्रायल केली जात आहे.
Local Body Elections : जि. प., न. प.च्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लागले लक्ष
यावेळी रोहित पवारांनी पक्षातील दोन-तीन वरिष्ठ नेत्यांवरही टोला लगावत अंतर्गत कुरघोड्यांचा मुद्दा उचलला. “पक्षात ‘चहापेक्षा किटली गरम असणारे’ काही सहकारी असले की सर्व काही आलबेल नसते,” असा थेट इशारा देत त्यांनी पक्षातील गटबाजी उघड केली.
Vote Theft : काँग्रेस कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या
अजित पवारांविरोधात उभ्या राहिलेल्या वादळात आता पुतणे रोहित पवार बचावासाठी पुढे सरसावल्याने या प्रकरणाचा राजकीय रंग अधिक गडद झाला आहे.
____