Ajit Pawars anger : तुम्हाला लाज वाटत नाही का रे? वेड्याचा बाजार!

Ajit Pawar got angry at the workers after they threw a plastic bag : प्लॅस्टिकची पिशवी टाकताच अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले

Wardha : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिस्तप्रिय स्वभावाची झलक वर्ध्यात पाहायला मिळाली. कामातील हयगय, निष्काळजीपणा किंवा बेशिस्तपणा अजिबात न पचवणारे अजित दादा गुरुवारी एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर अक्षरशः संतापले. कारणही तसंच होतं प्लॅस्टिकची पिशवी जमिनीवर फेकणं! ही घटना आणि त्यांचा संताप व्यक्त करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अजित पवार हे सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी पोहोचले होते. स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. काही कार्यकर्ते त्यांच्या पाया पडायला पुढे सरसावले. त्यावर अजित पवारांनी थेट सुनावत म्हटलं “पाया पडू नका, मला पाया पडलेलं आवडत नाही.” स्वागतासाठी आणलेले पुष्पगुच्छ आणि हार देताना एका पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याला हार मागितला. त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून हार काढला आणि पिशवी तिथेच जमिनीवर फेकली.

Mahayuti Government : जिल्हा पुरवठा कार्यालयात २३.५७ लाखांची अफरातफर!

हीच गोष्ट अजित पवारांच्या नजरेत भरली आणि दादा संतापले. जोरदार आवाजात त्यांनी कार्यकर्त्याला फैलावर घेतलं “असा कचरा करायचा? काय रे तुम्ही, वेड्याचा बाजार! तुम्हाला लाज वाटत नाही का रे? येडेच आहात घाण करता!” अशी फटकारणी सर्वांसमोर त्यांनी केली.

Raj – Fadnavis Visit : कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी गेले असतील !

यानंतर अजित पवार स्वतः पिशवी उचलायला वाकलेही. मात्र सुरक्षारक्षकाने ती उचलली. तरीही अजित दादांनी कार्यकर्त्यांना झापणं थांबवलं नाही. “१०० वेळा सांगतो, पिशव्या टाकू नका. लोकं शिव्या देतात,” अशी तंबी त्यांनी दिली. यानंतर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार समीर कुणावार, राजेश बकाने उपस्थित होते. तर पालकमंत्री पंकज भोयर परदेश दौऱ्यावर असल्याने गैरहजर होते.
वर्ध्यातील या घटनेनंतर अजित पवारांचा संताप आणि शिस्तीबद्दल ते पुन्हा चर्चेत आले आहेत.