Akola Airport : अकोल्यातील शिवानी विमानतळावर पायलट ट्रेनिंग स्कूल

Pilot training school to come up at Shivani Airport, Akola : लवकरच शिक्षण व रोजगाराला नवी चालना

Akola अकोल्याच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून, शहरातील शिवानी विमानतळावर लवकरच SKY NEX कंपनीची अत्याधुनिक पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोल्याच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे खासदार अनुप धोत्रे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
अकोला हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. SKY NEX च्या पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे अकोल्याच्या शैक्षणिक नकाशावर आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या संस्थेमुळे देशभरातील युवक-युवतींना उच्च दर्जाचे वैमानिक प्रशिक्षण मिळणार असून, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Local Body Elections : जिल्ह्यात ‘अल्पमताचे’ ४ नगराध्यक्ष; कारभारात संघर्षाचे संकेत?

या प्रकल्पामुळे केवळ विमानवाहतूक क्षेत्रातच नव्हे, तर पूरक सेवा, निवास, वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळणार आहे. अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक महत्त्वाची उपलब्धी असून, याचा थेट लाभ अकोलेकरांना होणार असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी स्पष्ट केले.