Prof. Anup Sharma appointed as BJP Graduate Cell Chief : प्रदेश नेत्यांकडून नियुक्ती; पक्ष कार्यालयात स्वागत सोहळा
Akola प्रबुद्ध समाज, पदवीधर शिक्षक आणि प्राध्यापक यांना संघटित करण्याचे सातत्याने कार्य करणारे प्रा. अनुप गोवर्धन शर्मा यांची भाजपा पदवीधर सेल प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवारी अकोल्यातील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या निवडीचे स्वागत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. शर्मा हे संघटनात्मक कार्यात सातत्याने यशस्वी ठरलेले नाव आहे. अमरावती विद्यापीठात ‘नुटा’विरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले होते. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे प्रभावी योगदान असून, त्यांच्या निवडीमुळे प्रबुद्ध समाजात आनंदाचे वातावरण आहे. विविध संस्था व संघटनांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
भाजपातर्फे प्रा. शर्मा यांच्याकडे आगामी पदवीधर मतदारसंघातील पक्ष संघटन बळकट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी पक्षाने त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान केला आहे.
Gutkha mafia : मेहकर पोलिसांची गुटखा माफियावर धडक कारवाई; ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
या नियुक्तीबाबत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष जयंत मसने यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री अॅड. आकाश कुंडकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तेजराव थोरात, विजय अग्रवाल, वसंत बाछुका आदी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मान्यता घेतली. प्रा. शर्मा यांना युवा मोर्चा आणि सोशल मीडियात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पक्षात विशेष मान्यता मिळाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.








