Akola Congress : अकोल्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी केव्हा? — स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर

Loyal Congress workers in Akola are waiting for an opportunity : पदासाठी संघर्ष कायम, स्थानिक नेतृत्वाची मागणी

Akola अकोल्यातील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मागील काही दिवसांपासून अस्वस्थता जाणवत आहे. 17 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये कार्यरत असणाऱ्यांना अद्यापही योग्य पद किंवा संधी न मिळाल्याची खंत कार्यकर्ते खुलेआम व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते, पक्ष अडचणीत असताना खांद्याला खांदा लावून उभं राहणाऱ्यांना डावललं जातं आणि बाहेरून येणाऱ्यांना पदं दिली जातात.
1978 मध्ये पक्षातील अनेक तोलामोलाचे नेते काँग्रेस सोडून गेले होते, त्या वेळी अकोल्यातील तरुणांनी इंदिरा गांधींच्या पाठिशी उभं राहत काँग्रेसला जिल्ह्यात नव्याने उभं केलं. या चळवळीत पुढील नेत्यांची नावं पुढे आली:

Irregular tender process at District Women’s Hospital : अकोल्यातील तीन वरिष्ठ आरोग्य अधिकारी निलंबित

अरुण दिवेकर, अजहर हुसेन, सुधाकरराव गणगणे, विजय कौसल, रमेश मामा मैसाने, आदींनी सक्रिय भूमिका बजावली. यातील काहींना राज्यस्तरावर संधी मिळाली, तर अनेक आजही पक्षाशी प्रामाणिकपणे जोडलेले आहेत.

पक्षविचाराशी प्रामाणिक राहणारे कार्यकर्ते – चंद्रकांत पनपालिया, रमेश बजाज, महेंद्रसिंग सलुजा, मोहसीन सैदी, गणेश पाठक यांसारखे अनेक कार्यकर्ते आजही विविध बैठकीत उपस्थित असतात. या कार्यकर्त्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही स्वकष्टाने संघटन उभं केलं. 1980-90 च्या काळात डॉ. श्रीकांत जिचकार आणि मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात अकोल्यात युवक काँग्रेस बळकट झाली. अरुण भागवत, दिलीप सरनाईक, सौ. संजीवनी बिहाडे, प्रदीप वाखरिया, नायगावकर, विजय मुळे, राजीव बोचे आदी अनेक कार्यकर्त्यांनी आपली ओळख निर्माण केली.

Sanatani terrorism : सनातनी दहशतवाद? हे तर ‘ थिंक टँक नव्हे, सेप्टिक टँक!’

प्रकाश तायडे, राजेश भारती, अविनाश देशमुख, प्रशांत भटकर, मनीष भांबुरकर, निलेश देशमुख यांसारख्या कार्यकर्त्यांनी मोदी लाटेतही काँग्रेसचा झेंडा खाली जाऊ दिला नाही. बूथ स्तरावर सक्रिय राहून संघटन मजबूत ठेवले. त्यानंतर तयार झालेल्या नव्या दमाच्या नेतृत्वातही महेश गणगणे, अंशुमन देशमुख, जावेद पटेल, आकाश कवडे, निनाद मानकर यांचं योगदान लक्षणीय आहे.

Teachers constituency : अमरावती विभागासाठी शिवसेनेची रणनिती; भगवा फडकवण्याचा निर्धार

काल जाहीर झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत 66% नवीन चेहरे आहेत, ही सकारात्मक बाब असली तरी अकोल्यातील युवक, विद्यार्थी काँग्रेस मात्र अपवादच ठरले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, बाहेरून आलेल्या “आयात” पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे, तर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. “आम्ही पक्षासाठी रक्ताचे पाणी केले, पण संधी बाहेरच्यांना का? आम्ही फक्त भाषणं ऐकायची का?” — असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.