व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Congress : अभय पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक; पक्षबदलाच्या चर्चांना...

Akola Congress : अभय पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक; पक्षबदलाच्या चर्चांना पूर्णविराम?

Talk of Abhay Patil switching parties appears to have been virtually put to rest : पक्षातील नाराजी निरीक्षकांपुढे मांडली, दखल घेण्याचे मिळाले आश्वासन

Akola महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष निरीक्षक दिलीपराव सरनाईक यांनी शुक्रवारी डॉ. अभय पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेत त्यांच्याशी सुमारे दीड तास सविस्तर चर्चा केली. डॉ. अभय पाटील यांच्या संभाव्य पक्षबदलाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या बैठकीला अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष प्रकाश तायडे, अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र गवई आणि धनंजय दांदळे उपस्थित होते.

Sunetra Pawar : ‘दादांवर खरंच प्रेम होतं का?’ एका पोस्टने राष्ट्रवादीतील संघर्षाची चर्चा ऐरणीवर !

बैठकीदरम्यान डॉ. अभय पाटील यांनी पक्षातील काही बाबींविषयीच्या तक्रारी आणि नाराजी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मांडली. त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन पक्षाच्या वतीने देण्यात आले. तसेच काँग्रेस पक्ष आणि विचारधारेशी कायम जोडून राहण्याची विनंती शिष्टमंडळाने डॉ. पाटील यांना केली.

बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे यांनी डॉ. अभय पाटील काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच ते लवकरच पक्षाच्या कार्यात सक्रिय होतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षबदलाच्या चर्चांना या बैठकीनंतर काही प्रमाणात पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

error: Content is protected !!