469 Candidates to Try Their Luck in Amravati : अकोला महानगरपालिका निवडणूक; प्रचाराचा धुरळा, राजकीय वातावरण तापले
Akola महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर एकूण ४६९ उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. सुरुवातीला ६३३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात ४६९ उमेदवार उरले आहेत. त्यामुळे आजपासून शहरभर प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
महापालिका निवडणूक ही सत्तेची चावी मानली जात असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार लढत होणार असून, प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह स्थानिक आघाड्या, बंडखोर आणि अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोग आणि प्रशासनाने आचारसंहिता कडकपणे राबवण्याचा इशारा दिला आहे. प्रचारादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून, अवैध बॅनर्स, पोस्टर्स, पैशांचा वापर आणि मद्यवाटपावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
Amravati Municipal Corporation : सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यांची तयारी अंतिम टप्प्यात
४६९ उमेदवारांच्या अंतिम यादीमुळे अकोल्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, आता मतदारांच्या मनाचा ताबा मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष आणि उमेदवारांची खरी कसोटी लागणार आहे. येत्या काही दिवसांत अकोला शहरात धगधगता प्रचार पाहायला मिळणार, यात शंका नाही.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला होता. समेट, नाराजी, बंडखोरी आणि शेवटच्या क्षणी झालेल्या समझोत्यांमुळे अनेक गणिते बदलली. अंतिम यादी जाहीर झाल्याने प्रचाराच्या रणधुमाळीला अधिकृत सुरुवात झाली आहे.
Mohan Bhagwat : लव्ह जिहाद कसा थांबवणार? मोहन भागवतांचा स्पष्ट मंत्र!
शहरातील विविध प्रभागांमध्ये तिरंगी व चौरंगी लढती पाहायला मिळणार असून, काही ठिकाणी बंडखोर उमेदवार प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. तरुण, महिला आणि नवख्या उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने मतदारही नव्या पर्यायांकडे लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे नेमका कौल कुणाच्या बाजूने लागणार, याबाबत सध्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, प्रत्येक पक्षाकडून घरोघरी प्रचार, बैठका, रॅली, रोड शो यांचा धडाका उडवला जाणार आहे. सोशल मीडियावरही प्रचाराची तोफ डागली जाणार असून, विकासकामांचे दावे, अपूर्ण प्रकल्प आणि भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.








