Voters resolve to support only the candidate who removes the wine shop : गोरक्षण रोड परिसरातील नागरिकांचा स्पष्ट इशारा
Akola अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५, गोरक्षण रोड परिसरात नागरिकांनी थेट राजकीय भूमिका मांडली आहे. “आमचं मत वाईन शॉप हटवणाऱ्याला” असा ठळक संदेश असलेला फलक सार्वजनिक ठिकाणी झळकल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
गोरक्षण रोड परिसरात असलेल्या वाईन शॉपमुळे महिलांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून, सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. याबाबत वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
NCP PMC Election 2026 : ‘एकच वादा, अजित दादा’; पुणेकरांना मेट्रो आणि बस प्रवास मिळणार मोफत!
या फलकाच्या माध्यमातून मतदारांनी उमेदवारांना स्पष्ट शब्दांत संदेश दिला असून, केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवला जाणार नसल्याचेही अधोरेखित केले आहे. वाईन शॉप हटवण्यासाठी ठोस पावले उचलणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्न निर्णायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, या प्रभागात वाईन शॉपचा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार या मागणीवर काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








