Akola Municipal Corporation : २० वर्षांत पाच महिला महापौर; आता नव्या आरक्षणाकडे लक्ष!

Five women mayors in 20 years, Men got the opportunity only three times : पुरुषांना केवळ तीनदा संधी; नवव्या महापौरपदासाठी आरक्षण कोणाच्या बाजूने?

Akola अकोला महापालिकेच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत महिलांचा ठसा अधिक ठळकपणे उमटलेला दिसून येतो. सन २००२ ते २०२२ या २० वर्षांच्या कालावधीत एकूण आठ महापौरांपैकी तब्बल पाच महिला महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. विशेष म्हणजे या काळात पुरुषांना केवळ तीनदाच महापौरपदाची संधी मिळाली. त्यामुळे आगामी महापौरपदाचे आरक्षण महिलांसाठीच राहणार की सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर होणार, याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यातील २९ महापालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण नगरविकास विभागाकडून रोटेशन पद्धतीने जाहीर केले जाणार असून, येत्या काही दिवसांत त्याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर होताच अकोला महापालिकेच्या नवव्या महापौरपदाची दिशा निश्चित होणार आहे.

Municipal Corporation Elections : प्रचाराचे नियम, निवडणूक खर्च अन् आचारसंहिता!

अकोला महापालिकेत एकूण २० प्रभाग असून, त्यातून ८० नगरसेवक निवडले जाणार आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर १९ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाकडून राजपत्राद्वारे अधिसूचना जारी केली जाणार आहे.

६ मार्च २००२ ते ८ मार्च २०२२ या कालावधीत अकोला महापालिकेच्या सत्ताकेंद्रावर महिलांचे वर्चस्व प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर ९ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकराज सुरू असून, आगामी निवडणुकीनंतर पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती सत्तेची सूत्रे जाणार आहेत. त्यामुळे आरक्षण जाहीर होताच संभाव्य महिला व पुरुष उमेदवारांची नावे चर्चेत येण्याची दाट शक्यता आहे.

seat struggle : शिवसेना–भाजपमध्ये तणाव; अधिक जागांसाठी शिंदे आग्रही

सत्तास्थापनेसाठी ‘४१’चा मॅजिक फिगर
८० सदस्यांच्या सभागृहात ४१ नगरसेवकांचे संख्याबळ मिळाल्यास स्पष्ट बहुमत सिद्ध होणार आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व पक्षनेता ही महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार रणनीती आखली जात आहे. अकोला महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे १६ जानेवारी २०२६ रोजी स्पष्ट होणार आहे.

आतापर्यंतचे महापौर
सुमनताई गावंडे : ६ मार्च २००२ – १८ फेब्रुवारी २००५
अश्विनीताई हातवळणे : १८ फेब्रुवारी २००५ – ५ मार्च २००७
मदन भरगड : ६ मार्च २००७ – ३ डिसेंबर २००९
सुरेश पाटील : ४ डिसेंबर २००९ – २४ ऑक्टोबर २०११
ज्योत्स्ना गवई : ९ मार्च २०१२ – ९ सप्टेंबर २०१४
उज्ज्वला देशमुख : १० सप्टेंबर २०१४ – ८ मार्च २०१७
विजय अग्रवाल : ९ मार्च २०१७ – २१ नोव्हेंबर २०१९
अर्चना मसने : २२ नोव्हेंबर २०१९ – ८ मार्च २०२२