
sharad-pawar-ajit-pawar-faction-local-leaders-reaction : महानगर आणि ग्रामीणमधील नेत्यांमध्ये दिलजमाईची चिन्हे; अकोल्यात ‘मॅच फिक्सिंग’ की ‘रस्सीखेच’?
Akola राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचे वारे वाहू लागल्याने अकोल्याच्या राजकीय मैदानातही मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन गटांत विभागलेली राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी सकारात्मक असल्याचे चित्र आहे. मात्र, विलीनीकरणानंतर ‘सत्तेचे वाटेकरी’ वाढणार असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहासोबतच आपल्या पदाची खुर्ची टिकवण्याची धाकधूकही निर्माण झाली आहे.
पक्षात फूट पडल्यानंतर अकोल्यात दोन्ही गटांची शक्ती विभागली गेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे ग्रामीण भागात आणि सहकार क्षेत्रात आजही मोठे वर्चस्व आहे. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटन भक्कम आहे. महानगराध्यक्ष आणि त्यांचे समर्थक अजित पवार गटात सक्रिय झाले होते. सध्या मनपामध्ये शरद पवार गटाचे ३ तर अजित पवार गटाचा १ नगरसेवक आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत १०० हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येण्याच्या बाजूने कौल दिल्याने विलीनीकरणाची प्रक्रिया स्थानिक पातळीवर सोपी मानली जात आहे.
Vidarbha State demand : पर्यटन व औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष, विदर्भाच्या अस्तित्वासाठी लढा
ग्रामीण भागात पकड कमी असलेल्या अजित पवार गटाला विलीनीकरणामुळे शरद पवारांच्या भक्कम संघटन जाळ्याचा फायदा मिळू शकतो. सत्तेत सहभागी होताना किंवा जागावाटपाच्या वेळी अजित पवार गटातील नेत्यांना सामावून घेताना जुन्या निष्ठावंतांना आपल्या वाट्याचा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे. “आमची विचारसरणी एकच आहे, पक्ष एकत्र आला तर ताकद वाढेल,” असे मत जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे आणि प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी व्यक्त केले आहे.
District and session court : शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांसह ११ जण निर्दोष
दोन्ही गट एकत्र आल्यास जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष आणि आगामी महापालिका निवडणुकीतील उमेदवारीवरून मोठी ओढाताण होण्याची चिन्हे आहेत. महानगरातील दोन्ही गटाचे नेते वैयक्तिक आयुष्यात मित्र असले, तरी राजकीय महत्त्वाकांक्षा विलीनीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात.








