व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Akola Police : तुझ्या मुलीला एका रात्रीसाठी माझ्याकडे पाठव, दहा हजार रुपये...

Akola Police : तुझ्या मुलीला एका रात्रीसाठी माझ्याकडे पाठव, दहा हजार रुपये देतो

Action taken against a police officer for misconduct with a accused woman : अकोल्यात एएसआयचे धक्कादायक कृत्य; महिला आरोपीकडून मुलीची मागणी

Akola सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कार्यरत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने (एएसआय) केलेल्या कथित गैरवर्तनामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. लॉकअपमध्ये असलेल्या महिला आरोपीकडे तिच्या मुलीला एका रात्रीसाठी पाठवण्याची मागणी करत, त्यासाठी १० हजार रुपये देण्याची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप संबंधित अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.

पीडित महिलेने हा प्रकार तपास अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करत आरोपी एएसआयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Mla Siddharth kharat : मेहकरच्या प्रशासकीय अनागोंदीवर लोकप्रतिनिधींचे ताशेरे

दरम्यान, आरोपीचे नाव राजेश जाधव असल्याचे समोर आले असून, त्याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
याच अधिकाऱ्याने यापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन मुलींनाही त्रास दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्या मुलींनी लेखी तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!