Affidavit of the Municipal Council President candidate becomes controversial : थेट उमेदवारीलाच आव्हान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष
Akot अकोट नगरपालिका निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी राणा यांच्या शपथपत्रातील विसंगतीवरून मोठे वादळ उठले आहे. फिरोजाबी यांच्या पती सय्यद शरीफ राणा हे अकोटमधील वंचित बहुजन आघाडीचे नेते असून, 2016 मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ते वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यांनी त्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत भाजपला जोरदार लढत दिली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हरिनारायण माकोडे यांनी त्यांचा पराभव केला होता.
दरम्यान, फिरोजाबी राणा यांच्या शपथपत्रात चौथ्या अपत्याची माहिती लपविल्याचा आरोप समोर आल्यानंतर या मुद्द्याने उग्र स्वरूप धारण केले आहे. शपथपत्रातील माहितीची अचूकता तपासण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे, उमेदवाराकडून दिलेली माहितीच ग्राह्य धरली जाते. त्यामुळे चुकीची माहिती देऊन निवडणूक लढविण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.
Akola Municipal Corporation : प्रभाग यादी दुरुस्तीच्या मुद्द्यावर ‘स्टंटबाजी’
या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने ते आपल्या न्यायालयात स्वीकारले असून, फिरोजाबी राणा यांच्या शपथपत्रातील विसंगतीवर आयोग काय भूमिका घेणार, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शपथपत्रातील चुकीच्या माहितीमुळे त्यांची उमेदवारी रद्द होणार का, अथवा ‘आक्षेप नाही’ म्हणून प्रकरण थंडपणे झाकले जाणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








