America in chaos : टॅरिफचा दबाव आणणाऱ्या अमेरिकेत मोठा हाहा:कार !

Country come standstill shutdown, and thousands will unemployed : शटडाऊन मुळे देश ठप्प, तर हजारो बेरोजगार होणार

Washington : अमेरिकेत शटडाऊन सुरू झाल्यामुळे संपूर्ण देश ठप्प पडल्याचे चित्र आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परदेशात टॅरिफचा दबाव आणत असतानाच देशांतर्गत मोठा आर्थिक आणि सामाजिक हाहा:कार माजला आहे. व्हाईट हाऊसने यावर गंभीर इशारा दिला असून, शटडाऊन दीर्घकाळ सुरू राहिल्यास अर्थव्यवस्थेला जबर फटका बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला शटडाऊनमुळे अमेरिकेच्या जीडीपीला तब्बल 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान होत आहे. याबाबत राष्ट्राध्यक्षांचे आर्थिक सल्लागार म्हणाले, “जर हे शटडाऊन महिनाभर सुरू राहिले तर किमान 43,000 लोक बेरोजगार होतील.”

duasehra melava : त्यांना हिंदू संस्कृती माहिती नाही, चिखलात लोळवायलाच हवं

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी या शटडाऊनसाठी थेट सिनेट डेमोक्रॅट्सना जबाबदार ठरवले. त्यांनी आरोप केला की, “बेकायदेशीर स्थलांतरितांना मोफत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी संघराज्य सरकार आणि अर्थव्यवस्था ओलीस धरली जात आहे.”

दरम्यान, एडीपीच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात खाजगी क्षेत्रातील 32,000 लोकांची नोकरी गेली आहे. आर्थिक सल्लागारांनी तयार केलेल्या अहवालानुसार, शटडाऊन एका महिन्यापर्यंत टिकल्यास “गंभीर आणि धोकादायक परिणाम” दिसतील.

Deekshabhoomi : या ऐतिहासिक स्थळावरून समानता, न्यायाची प्रेरणा मिळते !

या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसकडून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अमेरिकेतील टेक कंपन्यांसह अनेक उद्योगसंघटनांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर विरोधाची भूमिका घेतली आहे. विशेषतः एच-1बी व्हिसावर केलेल्या निर्णयामुळे विरोधाचा सूर आणखी तीव्र झाल्याचे दिसते.
ट्रम्प परदेशात पाकिस्तानशी जवळीक साधत असतानाच देशांतर्गत आर्थिक संकट वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे अमेरिकन राजकारण आणि अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ माजली आहे.

____