Union Home Minister Amit Shah slams the opposition : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना फटकारले
Ahilyanagar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात विरोधकांवर जिव्हारी घाला घातला. औरंगाबाद आणि अहमदनगर या शहरांच्या नामांतरावरून त्यांनी विरोधकांना जोरदार फटकारलं. “जे औरंगजेबाचे पाईक आहेत, त्यांच्यात संभाजीनगर नाव ठेवण्याची हिंमत नाही. हे काम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच करू शकतात,” असा घणाघात शाह यांनी केला.
शाह म्हणाले, “मला खूप आनंद वाटतो की या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्यात आलं आहे. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, तेव्हा भाजपा-शिवसेना सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आणि इथं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर ठेवलं. हे तेच लोक करू शकतात जे खरंच छत्रपतींचे अनुयायी आहेत.”
CMs warning : काटामारी करणारे कारखाने मी शोधलेत, त्यांना दाखवतो !
त्यांनी पुढे विरोधकांवर निशाणा साधत म्हटलं, “ज्यांना औरंगजेबाचं नाव घ्यायचं वेड आहे, त्यांच्याकडून धर्मवीर संभाजीराजेंचं नाव घेणं शक्यच नाही. आमचं सरकार हे शिवरायांच्या आदर्शांवर चालणारं सरकार आहे, जे स्वाभिमान आणि संस्कृती जपत विकास साधणार आहे.”
महायुती सरकारच्या काळात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर या तीन शहरांच्या नावबदलाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर या नावांनी ही शहरे ओळखली जाऊ लागली. राज्य सरकारने 13 मार्च 2024 रोजी अहमदनगरच्या नामांतरास मान्यता दिली, तर केंद्र सरकारने 4 ऑक्टोबर 2024 रोजी ‘अहिल्यानगर’ या नावाला अंतिम मंजुरी दिली. त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या शहरांच्या नामांतरालाही केंद्राची मान्यता मिळाली होती.
Amit Shah : अमित शाह यांची शिर्डीत फडणवीस, शिंदे अजितदादा सोबत मध्यरात्री गुप्त बैठक !
अहिल्यानगरमधील सभेत अमित शाह यांनी ‘स्वदेशीचा नारा’ देत जनतेला आवाहन केलं देशातील प्रत्येक नागरिकाने संकल्प केला पाहिजे की कोणतीही परदेशी वस्तू खरेदी करणार नाही. जर 140 कोटी लोकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर सुरू केला, तर 2047 पूर्वी भारत नक्कीच विकसित देश बनेल,” असं त्यांनी सांगितलं.
शाह म्हणाले, “भारत ही 140 कोटी लोकांची विशाल बाजारपेठ आहे. त्यामुळे जगातील सर्व कंपन्यांना इथे येऊन उत्पादन करावं लागेल. पण यासाठी देशातील व्यापारी आणि नागरिक दोघांनीही स्वदेशी उत्पादनांना चालना द्यावी लागेल.”
Electricity tariff hike : दिवाळीच्या तोंडावर वीजदरवाढीचा ‘शॉक’!
या मेळाव्यात शाह यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबतही चर्चा केली. सहकार क्षेत्रात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांची माहिती देत त्यांनी म्हटलं की, “सहकार क्षेत्र हे देशाच्या आर्थिक पायाभरणीचं बळ आहे. या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावलं उचलत आहे.”
________








