Breaking

Amit Shah : उद्घाटनाला दांडी, आता आवर्जून भेट देणार!

Home minister will visit Nagpur NCI : गृहमंत्र्यांना सापडला NCIच्या भेटीचा मुहूर्त; २६ ला नागपूर दौरा

Nagpur एप्रिल २०२३ मध्ये एनसीआयचे उद्घाटन झाले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. त्यादृष्टीने पूर्ण तयारी झाली होती. मात्र ऐनवेळी शाह यांचा नागपूर दौरा रद्द झाला होता. त्यानंतर त्यांचे नागपूर दौरे झाले, पण NCI भेटीचा मुहूर्त काही सापडत नव्हता. आता २६ मे रोजी नागपूर दौऱ्यावर असताना ते NCI ला आवर्जून भेट देणार आहेत.

केंद्रीय गृह मंत्री व सहकार मंत्री अमित शाह हे २६ मे रोजी विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे भेट देणार आहेत. उद्घाटनाला ऐनवेळी शाह यांनी येण्याचे टाळले होते. त्यामुळे विविध चर्चांनादेखील उधाण आले होते. त्यानंतर ते पहिल्यांदाच एनसीआयला भेट देणार आहेत हे विशेष.

CM Devendra Fadnavis : झुडपी जंगलांबाबतचा निर्णय ऐतिहासिक, विकासाला चालना मिळेल

गृहमंत्री अमित शाह यांचे २५ मे रोजी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. शाह यांच्या हस्ते २६ मे रोजी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ‘स्वस्ति निवास’ भूमिपूजन आणि चिचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिर्व्हसिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजन होणार आहे. शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरूवारी आढावा घेतला.

Uddhav Balasaheb Thackerey : जागावाटपात सन्मान झाला नाही तर आमचा मार्ग मोकळा!

या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी व यासाठी शासकीय यंत्रणा तथा आयोजक संस्था यांच्या तयारीचा आढावा घेवून विभागीय आयुक्त बिदरी यांनी यावेळी आवश्यक सूचना दिल्या. बैठकीला विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आयोजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.