व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amol mitkari ons naresh arora : अमोल मिटकरींचा नरेश अरोरांवर गंभीर आरोपांचा...

Amol mitkari ons naresh arora : अमोल मिटकरींचा नरेश अरोरांवर गंभीर आरोपांचा भडिमार

amol-mitkari-allegations-naresh-arora-ncp-election-strategy-row-ajit-pawar-controversy : चुकीचे सर्व्हे, आर्थिक लाभ आणि अजित पवारांवर दबावाचा दावा, राष्ट्रवादीत नवा वाद

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा अंतर्गत वाद उफाळून आला असून अमोल मिटकरी यांनी पक्षाच्या निवडणूक रणनीतीशी संबंधित नरेश अरोरा यांच्यावर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. निवडणूक प्रचारासाठी काम लॉ कॉलेजमध्ये णाऱ्या ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेचे प्रमुख असलेल्या अरोरा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सलग दुसऱ्यांदा सार्वजनिक टीका केली आहे.

अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये नरेश अरोरा यांच्यावर चुकीचे सर्व्हे सादर केल्याचा आरोप केला आहे. पक्षातील विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊ नये, असे दिशाभूल करणारे अहवाल अरोरा यांनी दिले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र, त्या सर्व्हेला न जुमानता अजित पवार यांनी स्वतःच्या यंत्रणेवर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आणि तेच आमदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, असेही मिटकरी यांनी नमूद केले आहे.

board marksheet certificate : दहावी-बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आता एकाच कागदावर मिळणार

तसेच काही आमदार अरोरांना भेटत नसल्यास किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवत नसल्यास त्यांच्याविषयी चुकीची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली जात होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. सुरुवातीला या अहवालांवर विश्वास ठेवून काही आमदारांना फटकारण्यात आले, मात्र नंतर वस्तुस्थिती समोर आल्यानंतर या पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीदरम्यान कमी जागा लढवण्याचा सल्ला देणे, विरोधकांविरोधात उमेदवार न देण्याचा आग्रह धरणे आणि काही सभांचे नियोजन रद्द करणे यामागेही अरोरा यांचा सहभाग असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. तसेच प्रचाराच्या नावाखाली आर्थिक लाभ घेतला गेला, मात्र प्रत्यक्षात अपेक्षित काम झाले नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

Ashok kharat case : भोंदूबाबा प्रकरणात नाट्यमय घडामोडी; पत्नी फरार तर मुलगा पोलिसांच्या ताब्यात

अमोल मिटकरी यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांच्यावर अवाजवी घोषणा करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार देत फक्त शक्य असलेल्या गोष्टींचीच जनतेसमोर मांडणी केली. तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्याच्या सूचनाही अरोरा देत होते, पण त्या कधीही मान्य केल्या गेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची दूरदृष्टी ठरली टर्निंग पॉइंट,चंद्रपूरात ‘ज्ञानगंगा’

याशिवाय अरोरा यांनी पक्षाच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप करत त्यांनी विमान कंपनी स्थापन केल्याची आणि सेकंड-हँड विमान खरेदी केल्याची माहिती ऐकिवात असल्याचेही म्हटले आहे. या सर्व बाबींवर स्पष्ट उत्तरे दिल्याशिवाय अरोरांनी महाराष्ट्र सोडू नये, अशीही भूमिका मिटकरी यांनी मांडली आहे.

या सर्व आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्या वादाला तोंड फुटले असून या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!