Amol Mitkari : अकोला जिल्ह्यात टेक्सटाइल पार्क कधी उभारणार?

 

When will a textile park be established in Akola district? : आमदारांनी लक्ष वेधले; अधिवेशनात सरकारला करून दिली आठवण

Akola अकोला, बुलडाणा आणि वाशिम या परिसरात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते. अकोला जिल्हा हा या भागाचा केंद्रबिंदू असल्याने येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विशेष म्हणजे, निवडणूक काळात माहितीच्या नेत्यांनी अकोला टेक्स्टाईल पार्क उभारण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले होते. एक प्रकारे लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार मिटकरी यांनी सरकारला त्याचे आठवणच करून दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. याशिवाय या जिल्ह्याची ओळख ‘कॉटन सिटी’ म्हणून संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. या भागातील हवामान कापसाच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे येथे टेक्सटाइल पार्क उभारल्यास शेतकरी व स्थानिकांना मोठा फायदा होईल.

Amol Mitkari : कोरटकर दुबईला पळाला? छापा नागपुरात!

टेक्सटाइल पार्कमुळे कापसावर प्रक्रिया करणारे विविध लघुउद्योग उभे राहतील. यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे अधिक चांगले दर मिळतील आणि रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. अकोला जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात यावे, अशी मागणीही आ. मिटकरी यांनी केली.

यासोबतच कापसावर प्रक्रिया करणारे प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, कापूस संशोधनासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा आणि कृषी विद्यापीठाला या संदर्भात मार्गदर्शन करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

Amol Mitkari : सत्ताधारी आमदारही मंत्रालयातील दलालीचे शिकार

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना त्यांच्या पिकांना योग्य दर मिळावा, यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, अशी भूमिका मिटकरी यांनी मांडली. सोयाबीन विक्रीसाठी ५ क्विंटलची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, अशी कोणतीही मर्यादा शेतकऱ्यांसाठी लागू करू नये, जेणेकरून त्यांना अधिक फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.