aghori-pooja-in-akola-november-2025-connected-ajit-pawar-accident-amol-mitkari : आमदार अमोल मिटकरींचा गंभीर आरोप, तपासाची मागणी
Akola भिगवण रोडवरील सहयोग सोसायटी परिसरात नोव्हेंबर २०२५ मध्ये कथित अघोरी पूजांचा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. १८, १९ आणि २० नोव्हेंबर २०२५ या तारखांना अनुक्रमे शिवरात्री व अमावस्येचे योग असताना या कालावधीत संशयास्पद पूजा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या अघोरी पूजेचा संबंध थेट अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघाताची जोडला आहे.
या प्रकरणात अशोक खरात उर्फ भोंदू बाबा यांच्या ‘शिवलिका आश्रम’चे नाव समोर येत आहे. आश्रमात भगवान शंकराची पूजा होत असल्याचा दावा केला जात असला, तरी येथे अघोरी पद्धतीच्या पूजा केल्या जात असल्याचा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच, राजकीय लाभासाठी काही भक्तांकडून अशा पूजांचे आदेश पाळले जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.
Municipal corporation : ‘या’ महापालिकेच्या नावात होणार बदल?, नामकरणाचा प्रस्ताव शासनाकडे
मिटकरी यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचा संदर्भ देत, ते अंधश्रद्धा किंवा कर्मकांडांना कधीही थारा देत नसल्याचे नमूद केले. मात्र, या प्रकरणात अशोक खरात याच्या व्हीएसआर कंपनीसोबत कनेक्शनचा मुद्दा पुढे येत असून, २७ जानेवारीला पुण्याला गेलेले अजित पवार २८ जानेवारीला सकाळी व्हीएसआरच्या विमानाने कोणाच्या सल्ल्याने गेले, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
Rupali chakankar : भोंदूबाबा प्रकरणाचा फटका; रुपाली चाकणकरांचा राजीनामा
तसेच, १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत संबंधित बाबा व आश्रमातील पुजाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे. या तपासातून संपूर्ण प्रकरण उघड होऊ शकते, असा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.








