Alliance Air withdraws invitation sent to Chief Minister : मुख्यमंत्र्यांना पाठवलेले निमंत्रण घेतले मागे; अधिकृत घोषणेपूर्वीच गोंधळ
Amravati अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांची आहे. परंतु, अद्याप त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर किंवा उद्घाटन सोहळ्यातच ही घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र अलायन्स एअर कंपनीने उद्घाटनापूर्वीच परस्पर नामकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना पाठविलेले निमंत्रण देखील कंपनीला मागे घ्यावे लागले.
अमरावती येथील नवीन विमानतळाच्या उद्घाटनासाठी ‘डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ, अमरावती’ या नावाने निमंत्रण पाठवले गेले. अलायन्स एअर कंपनीने Alliance Air मुख्यमंत्र्यांसह खासदारांना पाठवलेल्या या पत्रात अधिकृत न झालेल्या नावाचा उल्लेख केल्याने राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत गोंधळ उडाला. परिणामी, ही निमंत्रणे तत्काळ मागे घेण्यात आली.
Local Body Elections : अमरावती जिल्ह्यातील गाव कारभाऱ्यांची आरक्षण सोडत!
या संदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) स्पष्ट आक्षेप नोंदवत, अलायन्स एअरला ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून तातडीने खुलासा मागवला आहे. विमानतळाच्या नावावर अंतिम निर्णय हा शासनस्तरावर घेतला जातो आणि तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा अनधिकृत उल्लेख टाळावा, अशी भूमिका MADC ने मांडली आहे.
Nanded Politics : नांदेडमध्ये अशोकराव – प्रतापराव संघर्ष शिगेला !
दरम्यान, अमरावतीतील विमानतळास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. मात्र, अद्याप शासनाकडून या संदर्भात कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही. सदर प्रकारामुळे उद्घाटनाच्या निमंत्रणाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यासंदर्भातील पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन आणि कंपनीदरम्यान समन्वय सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.








