Fake police officers robbed by claiming to be from the Crime Branch : माजी गृहराज्यमंत्र्यांच्या सहाय्यकाच्या भावाला गंडा
Amravati ‘हम क्राइम ब्रांच वाले हैं’ असे भासवून भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दरोडेखोरांनी दागिने लंपास केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकारांमुळे अमरावती जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पहिली घटना अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी बायपासजवळ घडली. माजी आमदार प्रा. साहेबराव तट्टे व माजी गृहराज्यमंत्री मंत्री डॉ. रणजित पाटील यांचे स्वीय सहायक राहिलेले अजय पांडे यांचे बंधू गजानन पांडे (वय ५५) हे व्यवसायातील रक्कम घेऊन तिवसाकडे जात असताना, तीन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवलं.
Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्या अपात्रेच्या याचिकेवरील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
हेल्मेट व काळ्या जॅकेटमधील या भामट्यांनी “हम क्राईम ब्रांच वाले है, डकैती हो रही है, तू सोना पहनकर क्यों जा रहा है?” असे म्हणत त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅमची सोन्याची साखळी, साईबाबा लॉकेट (५ ग्रॅम) आणि १० ग्रॅमची अंगठी असा सुमारे ३ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटला. हे तिघे अमरावतीकडे पळाले असून, पोलिस तपास सुरू आहे.
दुसरी घटना मोर्शीतील महादेव कॉलनी परिसरात सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. श्यामसुंदर बंग (वय ७०) हे तहसील कार्यालयातून परतत असताना, दोन बाईकस्वारांनी त्यांना अडवून आपण क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची बतावणी केली. “तुमचं सोने सुरक्षित ठेवा,” असं सांगून त्यांनी बंग यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम सोन्याची साखळी, ५ ग्रॅम लॉकेट आणि ५ ग्रॅमची अंगठी असलेले दागिने एका रुमालात गुंडाळल्याचा बहाणा करत हातचलाखीने दुसरा रुमाल त्यांच्या हातात दिला व पलायन केलं.
Marathi Vs Hindi: हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा
पोलिसांनी दोन्ही घटनांची गंभीर दखल घेतली असून तिवसा व मोर्शी पोलिस ठाण्यांमधून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत आहेत. प्राथमिक तपासात दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.