व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Marathi Vs Hindi: हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा

Marathi Vs Hindi: हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा

Provision for Maharashtra State Hindi Sahitya Academy schemes : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी योजनांसाठी लाखो रुपयांची तरतूद

Mumbai : राज्यात सध्या हिंदी सक्तीचा वाद सुरू असतानाच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीकडून नवीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात हिंदी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी कार्यरत आहे. या अकादमीच्या वतीने विविध पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारामध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडणार आहे.

हिंदी सक्तीचा वाद सुरू असतानाच सरकारने महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी योजनांसाठी लाखो रुपयांची तरतूद केल्याचे समोर आले आहे.’ भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी साहित्य शिखर सम्मान’ हा पुरस्कार सुरु करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात हिंदी साहित्य क्षेत्रात प्रदीर्घ काळ मोलाचे योगदान देणाऱ्या व त्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या एका मराठी भाषिक जेष्ठ हिंदी साहित्यिकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.

Raj & Uddhav Thackeray : संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू

सदर पुरस्काराचे स्वरुप तीन लाख रुपये, शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र असे असेल. आधीच इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय चर्चेत असतानाच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीकडून नवीन पुरस्काराची घोषणा झाल्याने नवीन वाद उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून आपला नेता तेथे बसविण्यासाठी अघोरी विद्येचा वापर

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी 19 लाखाचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या ‘ पुस्तक प्रकाशन अनुदान’ योजनेंतर्गत 6 वेगवेगळ्या पुस्तकांच्या नावांना 1 लाख 15 हजाराचा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

error: Content is protected !!