Contaminated water supply to people in 73 places : शुद्धीकरणाकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष; 3,199 नमुन्यांची तपासणी
Amravati प्रत्येक ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामीण भागातील १५ तालुक्यांमधील ७३ ठिकाणचे पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती तपासणीत समोर आली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी पाणी नमुन्यात क्लोरिनचा २० टक्क्यांपेक्षा कमी वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. क्लोरिनचा कमी वापर केल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य ठरले आहे.
संबंधित ग्रामपंचायतींनी पाणी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. तपासणी केलेल्या ३,१९९ नमुन्यांपैकी ग्रामीण भागातील ७३ जलस्रोतांचे (३.०५ टक्के) पाणी दूषित आढळले आहे. जिल्ह्यातील जलस्रोतांची अणुजैविक तपासणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे केली जाते. या अंतर्गत प्रत्येक जलस्रोतांचे दरमहा जलसुरक्षा रक्षकामार्फत नमुने गोळा करून ते तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठवले जातात.
Mahayuti Government : अकोला ७.३८ तर अमरावतीत ८.०३ टक्के रेडीरेकनर दरवाढ!
जल शुद्धीकरण करताना क्लोरिन वापराचे प्रमाण ३३ टक्के अपेक्षित आहे. मात्र, ३३ टक्क्यांपेक्षा कमी क्लोरिन वापर केल्यास शुद्धीकरण अपूर्ण मानले जाते. जिल्हा प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर आरोग्य विभागाने दूषित नमुन्यांविषयी अहवाल सादर केला. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस बजावून तात्काळ पाणी शुद्धीकरण करण्याचे निर्देश पंचायत समितीमार्फत देण्यात आले आहेत.
ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील जलस्रोत दूषित आढळले, त्या ग्रामपंचायतींना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना पाणी शुद्धीकरणाच्या आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, तेथील पाणी सुपर क्लोरिनेशन प्रक्रियेद्वारे शुद्ध करून त्याचे पुनः नमुना परीक्षण केले जात आहे. पाणी पिण्यास योग्य असल्यास त्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाच्या वतीने सूचित केले जाते.
Shakuntala Railway : ब्रिटिश कंपनीकडून ‘शकुंतला’चा ताबा घेणार!
फेब्रुवारी २०२५ च्या अहवालानुसार ग्रामीण भागातील २,३९१ आणि शहरी भागातील ८०८ नमुने असे एकूण ३,१९९ पाणी नमुने तपासले गेले. यात ७३ ग्रामीण आणि ५१ शहरी जलस्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले. ग्रामपंचायतींना त्यांच्या जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार रेड, पिवळे आणि हिरवे कार्ड दिले जाते.
रेड कार्ड: ७० टक्क्यांहून अधिक लोक दूषित पाणी पित असल्यास (तीव्र जोखीम)
पिवळे कार्ड: ३१ ते ६० टक्के नागरिक दूषित पाणी पित असल्यास (मध्यम जोखीम)
हिरवे कार्ड: शून्य ते ३० टक्के दूषित जलस्रोत असल्यास (सौम्य जोखीम)