Amravati Municipal Corporation : अमरावती महापालिकेच्या तिजोरीची चावी कुणाकडे?

amravati-municipal-corporation-standing-committee-chairman-to-be-decided-on-6th-march : मिलिंद बांबल की अविनाश मार्डीकर? स्थायी समिती सभापतीपदाचा फैसला शुक्रवारी

Amravati महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. शुक्रवार, ६ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी भाजपचे मिलिंद बांबल की राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे अविनाश मार्डीकर यापैकी कुणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होण्याची शक्यता आहे.
महापालिका नगरसचिव कार्यालयाने ६ मार्च रोजी होणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात पक्षनेते, विरोधी पक्षनेते व सर्व गटनेत्यांना पत्राद्वारे कळविले आहे. २० फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ८७ नगरसेवकांमधून पक्षीय संख्याबळानुसार १६ सदस्यांची स्थायी समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षीय समीकरणे लक्षात घेता स्थायी समितीवर महायुतीचे वर्चस्व असून सभापतीपदही महायुतीलाच मिळेल, असे चित्र आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हात उंचावून मतदान पद्धतीने ही निवडणूक पार पडणार असल्याची माहिती नगरसचिव संदीप वडूरकर यांनी दिली.

Buldhana Politics : बुलढाण्यात राष्ट्रवादी पुन्हा ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये?; संघटनबांधणीला वेग

महापालिकेतील आर्थिक निर्णयांवर शिक्कामोर्तब करणाऱ्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. यामध्ये
भाजप : मिलिंद बांबल, पद्मजा कौंडण्य, पंचफुला चव्हाण, स्मिता सूर्यवंशी, विनोद तनवाईस
काँग्रेस : ललिता रतावा, प्रशांत महल्ले, अस्मा फिरोज खान
युवा स्वाभिमान : प्रा. प्रशांत वानखडे, प्रियंका पाटणे, दीपक साहू
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : अविनाश मार्डीकर, मीनल सवाई
एमआयएम : सलाउद्दीन इक्राममुद्दीन, नाजीम खान करीम खान
शिंदेसेना : मंजूषा जाधव
एकूण १६ पैकी ११ सदस्य महायुतीचे असल्याने सभापतीपदावर महायुतीचा उमेदवार विराजमान होण्याची शक्यता अधिक आहे.

Prataprao Jadhav : प्रतापराव जाधवांचं चाललंय काय? महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह!

मार्डीकरांची ‘एन्ट्री’ चर्चेत
२० फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे गटनेते अविनाश मार्डीकर यांची स्थायी समितीत अचानक सदस्य म्हणून झालेली ‘एन्ट्री’ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयाच्या दृष्टीने सभापतीपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.