election-spendings-18crores-amravati-municipal-corporation : मंडप, पाणी, रॅम्प, भोजन आदींवर मोठा खर्च, ८०५ मतदान केंद्रांवर वाढीव सुविधा
Amravati तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडली, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला. मात्र या निवडणुकीसाठी दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १८ कोटी रुपयांपर्यंत खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या निवडणूक लेखाशीर्षात ६ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ५ कोटी ८८ लाख १४ हजार ३३३ रुपये खर्च झाले असून केवळ ११ लाख ८५ हजार ६६७ रुपये शिल्लक आहेत. दुसरीकडे विविध विभागांची सुमारे १२ कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने ती अदा करण्याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभागांचे सीमांकन ते निकाल जाहीर होईपर्यंतचा संपूर्ण खर्च महापालिकेला करावा लागतो. ही प्रक्रिया साधारण दोन ते तीन महिने चालली. यंदा मतदान केंद्रांवर नागरिकांसाठी अधिक सोयी-सुविधांवर भर देण्यात आल्याने खर्चात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Criem News: बुलढाणा हादरले! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून खासगी फोटोच्या आधारे ब्लॅकमेल
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नामांकन प्रक्रिया, मतदान केंद्रे आणि मतमोजणी स्थळांवरील सुविधा उभारण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर होती. पाचही झोनसह नामांकन अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी मंडप, शामियाने, पिण्याचे पाणी, रॅम्प, खुर्च्या, शौचालय दुरुस्ती, नव्याने बांधकाम, मतदार याद्या प्रसिद्ध करणे आदी व्यवस्था करण्यात आल्या.
याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक आणि सात आरओंना वाहनांसह सुविधा, निवडणूक कामासाठी लागणारे मनुष्यबळ, त्यांचे मानधन, झोननिहाय साहित्य वितरण व्यवस्था आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे मानधन यावरही मोठा खर्च झाला. त्यामुळे २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात अतिरिक्त १२ कोटी रुपयांची तरतूद मागण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
supreme-court : ओबीसी क्रिमिलेयर ठरवताना पालकांचे वेतन एकमेव निकष ठरू शकत नाही
महापालिका निवडणूक ८०५ मतदान केंद्रांवर घेण्यात आली. ६६१ उमेदवार रिंगणात असताना ८७ नगरसेवक निवडून आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप, पिण्याचे पाणी, अपंगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, प्रकाश व्यवस्था, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी नाश्ता, चहा, पाणी आणि भोजन पुरविण्यात आले. मतमोजणी केंद्रावरही अद्ययावत व्यवस्था करण्यात आल्याने एकूण खर्च वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.








