Amravati Municipal Corporation : महाआघाडीच लढणार, पण ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर

First list of 20 candidates released by Shivsena (Thackeray group) : महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

Amravati आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रविवारी सायंकाळी आपली पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही यादी घोषित करण्यात आली असून, यामध्ये एकूण २० उमेदवारांचा समावेश आहे.
जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी सांगितले की, शिवसेना (उबाठा) या निवडणुकीत सुमारे ५५ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तसेच, शिवसेना (उबाठा)ची मनसे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेनुसार, एकूण ८७ जागांपैकी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असून, काही ठिकाणी परस्पर थेट पाठिंबा दिला जाणार आहे.

Akola Municipal Corporation Elections : भाजप–राष्ट्रवादी युती निश्चित, राज्यमंत्र्यांनी दिले संकेत

पहिल्या यादीतील उमेदवार व प्रभागनिहाय तपशील :
प्रदीप विष्णुपंत बाजड – प्रभाग क्र. ३, नवसारी (गट ब – इ. मा. प्र.)
प्रवीण वसंतराव हरमकर – प्रभाग क्र. १४, जवाहर गेट–बुधवारा
वैशाली आशिष विधाते – प्रभाग क्र. ३, नवसारी (गट क – सर्वसाधारण महिला)
शारदा संजय गोंडाने – प्रभाग क्र. १०, बेनोडा भीमटेकडी (गट अ – अ. जा. महिला)
विजय किसनलाल मंडले – प्रभाग क्र. ११, फ्रेजरपुरा–रुख्मिणी नगर (गट ब – इ. मा. प्र.)
जयश्री देवराव कुऱ्हेकर – प्रभाग क्र. १२, स्वामी विवेकानंद कॉलनी–बेलपुरा (गट अ – अ. जा.)
विशाखा प्रवीण हरमकर – प्रभाग क्र. १४, जवाहर गेट–बुधवारा
पूनम पियूष धोटे – प्रभाग क्र. १३, अंबापेठ–गोरक्षण (गट क – सर्वसाधारण महिला)
सुषमा रविकांत काकडे – प्रभाग क्र. १७, गडगडेश्वर (गट क – सर्वसाधारण महिला)
संजय नामदेवराव शेटे – प्रभाग क्र. २०, सूतगिरणी–सामरा नगर (गट ड – सर्वसाधारण)
संजय रामकृष्ण गव्हाळे – प्रभाग क्र. २०, सूतगिरणी–सामरा नगर (गट अ – अ. जा.)
संगीता सुखलाल कैथवास – प्रभाग क्र. २१, जुनी वस्ती बडनेरा (गट अ – अ. जा.)
अर्चना बंडू धामणे – प्रभाग क्र. २२, नवी वस्ती बडनेरा (गट अ – अ. जा.)
पंजाबराव तायवाडे – प्रभाग क्र. ६, विलास नगर–मोरबाग–गवळीपुरा (गट ड – सर्वसाधारण)
बाळकृष्ण आढाऊ – प्रभाग क्र. २, संत गाडगेबाबा–पीडीएमसी (गट ड – सर्वसाधारण)
प्रवीणा सिताराम आठवले – प्रभाग क्र. ३, नवसारी (गट अ – अ. जा.)
अजय जयसिंग भिलावेकर – प्रभाग क्र. ८, जॉग स्टेडियम–चपराशीपुरा (गट ब – अ. ज.)
कोकिळा रामकृष्ण सोळंके – प्रभाग क्र. २०, सूतगिरणी (गट ब – इ. मा. प्र. महिला)
फरजान परवीन सय्यद शकील – प्रभाग क्र. ४, जमील कॉलनी, लालखडी (गट ब – सर्वसाधारण महिला)
चैतन्य विकास काळे – प्रभाग क्र. २२, नवी वस्ती बडनेरा (गट ब – इ. मा. प्र.)