Breaking

Amravati Municipal Corporation: आमदारांनी गाठली महानगरपालिका !

 

Political Parties focusing on local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी

अमरावती- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध नेत्यांना लागले आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. अमरावतीच्या Amravati आमदार सुलभा फडके यांनी त्याच दृष्टिकोनातून गुरुवारी महापालिकेत धाव घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

शहराच्या सर्वागीण विकासासाठी कार्य करणारी अमरावती महानगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहरी भागाच्या विकासासाठी व योजनांच्या अंमलबजावणीचे मोठे दायीत्व महानगरपालिकेला पार पाडावे लागते. दिवसेंदिवस वाढते शहरीकरण लक्षात घेता नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे अमरावती शहर हे आपले घर ही भावना सर्वांनी मनात बाळगण्याची गरज आहे. तसेच शहराला नवा आयाम व लौकिक मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. सर्व यंत्रणांनी संवाद व समन्वय साधून अमरावती महानगरपालिका क्षेत्रात सुखसुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार सुलभा खोडके यांनी अधिकाऱ्यांना केले.

आमदार सुलभा खोडके यांनी महापालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बैठक घेतली. विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. प्रशासनाच्यावतीने आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आमदार खोडके यांचे स्वागत केले. त्यानंतर आयुक्तांनी महानगरपालिकेतील सर्व विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबाबत माहिती दिली. यावेळी आमदार खोडके यांनी प्रत्येक विभागात चालणाऱ्या कामांची कार्यपध्दती जाणून घेतली.

अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत सूचना दिल्या. या आढावा बैठकीत आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपआयुक्तद्वय डॉ. मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे यांच्यासह मनपा झोनस्तरीय अधिकारी, विभागप्रमुख तसेच सर्व सहकारी उपस्थित होते.

Buldhana Collector : गौण खनिजाची अवैध वाहतूक; जिल्हाधिकारी ‘ॲक्शन मोड’वर!

विकासाच्या मुद्द्यावर फोकस
आमदार सुलभा खोडके यांनी बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, नगर रचना, मालमत्ता कर, अतिक्रमण विभाग, उद्यान, प्रकाश, पशुवैद्यकीय, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच शिवटेकडी (मालटेकडी) व वडाळी तलाव-उद्यान, शहरातील साफ सफाई व कचरा उचलणेबाबत, तसेच आरोग्य विभागाशी संबंधित कामांबाबत चर्चा केली.

63 शाळा डिजीटल
नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून संबंधिताना निर्देशित केले. महापालिकेच्या 63 शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. तेथे संगणक कक्ष, चांगल्या भौतिक सुविधा निर्माण होणार आहेत. विद्यार्थीहित लक्षात घेता त्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.