Amravati Municipal Corporation : ‘बॅक डोअर एन्ट्री’वरून राजकीय वादंग; ८ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवर विरोधक आक्रमक

amravati-municipal-corporation-co-opted-members-appointment-controversy : तज्ज्ञांच्या नावाखाली राजकीय पुनर्वसन? महापौरांच्या उपस्थितीत सदस्यांना प्रमाणपत्र वाटप

Amravati अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शुक्रवारी ८ स्वीकृत सदस्यांची (Co-opted Members) नियुक्ती करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात ‘बॅक डोअर एन्ट्री’ची जोरदार चर्चा सुरू झाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना संधी देण्याच्या उद्देशाने असलेल्या या तरतुदीचा वापर राजकीय सोयीसाठी केल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

नूतन महापौर श्रीचंद तेजवानी आणि महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत या नावांना अधिकृत मान्यता देण्यात आली. नवनियुक्त सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार, ज्या व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाहीत, परंतु ज्यांच्याकडे विशिष्ट विषयांचे ज्ञान किंवा सामाजिक अनुभव आहे, अशा व्यक्तींची नियुक्ती ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून केली जाते.

Chandrapur Mayor election : चंद्रपूर महापालिका सत्तास्थापना वादावर काँग्रेसमध्ये खळबळ !

विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेल्या नावांमध्ये वकील, प्राध्यापक आणि व्यावसायिक अशा क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे:
भाजप: ॲड. प्रशांत देशपांडे, प्रा. संजय तिरथकर.
शिंदेसेना, बसप, उद्धवसेना (युती): दिनेश बूब.
काँग्रेस: मिलिंद चिमोटे, अनिल अग्रवाल.
युवा स्वाभिमान: संजय हिंगासपुरे.
राष्ट्रवादी (अजित पवार): भोजराज काळे.
एमआयएम: मुनज्जर अली.

Shrikant Shinde : कल्याण-डोंबिवली कात टाकणार! ४,८९७ कोटींच्या निधीतून पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार

या नियुक्तीनंतर सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला, ज्यावर चर्चा करताना अनेक नेत्यांनी आपली मते मांडली. भाजपचे गटनेते चेतन गावंडे आणि राष्ट्रवादीचे अविनाश मार्डीकर यांनी या नियुक्तींचे समर्थन करत सदस्यांच्या अनुभवाचा शहराला फायदा होईल, असे सांगितले. मात्र, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत आणि माजी महापौर विलास इंगोले यांनी लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.