Amravati Municipal Corporation Election : भाजपला धक्का, युवा स्वाभिमानची मुसंडी!

New power dynamics emerge in Amravati : राणांची झेप तीनवरून १५ पर्यंत, अमरावती महापालिकेत नवे सत्तासमीकरण

Amravati अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये ४५ उमेदवारांसह स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यंदा मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीने (वायएसपी) जोरदार मुसंडी मारत शहराच्या राजकारणात आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे. भाजपाचे यंदा २५ उमेदवार निवडून आले असून, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला मोठी पिछेहाट सहन करावी लागली आहे.

२०१७ मध्ये रवी राणा Ravi Rana यांच्या युवा स्वाभिमानचे केवळ ३ उमेदवार विजयी झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत वायएसपीचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत पक्षाच्या १२ जागांची वाढ झाली असून, ही कामगिरी अमरावतीच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या अवघ्या चार दिवस आधी भाजपाने वायएसपीसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फटका भाजपलाच बसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

 

 

 

Akola Municipal Corporation Election : पतीने पत्नीची, मुलीने वडिलांची, तर वहिनीने राखली दिराची जागा!

राजकीय विश्लेषकांच्या मते, ही युती कायम राहिली असती, तर दोन्ही पक्षांचे मिळून सुमारे ४० उमेदवार विजयी झाले असते. मात्र, भाजपचा हा डाव त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यंदा प्रथमच मोठ्या तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरली होती. पक्षाने सर्वाधिक ८५ उमेदवार उभे केले होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात केवळ ११ उमेदवारांनाच यश मिळाले. निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाने २३ ते २५ उमेदवार निवडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, मतदारांचा कौल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने ही अपेक्षा फोल ठरली.

BMC Election 2026 : ‘देवेंद्र-रवींद्र’ जोडीने केली कमाल, विरोधकांना केले भुईसपाट

या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांनी सर्वच अपक्ष उमेदवारांना जवळपास नाकारले. याउलट, एमआयएमने गेल्या वेळच्या तुलनेत आपल्या कामगिरीत सुधारणा करत १२ उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे शहरातील अल्पसंख्याक मतदारांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढल्याचे दिसून येत आहे.
एकूणच, अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपचे वर्चस्व कमी झाले असून, युवा स्वाभिमानसह इतर पक्षांना संधी मिळाली आहे. या निकालांमुळे महापालिकेतील आगामी सत्तासमीकरणे अधिकच चुरशीची ठरणार असून, महापौरपदासाठीची गणिते आता नव्याने मांडली जाणार आहेत.