Amravati municipal corporation : काँग्रेसचा गटनेता ठरला, माजी महापौराला जबाबदारी

Sanjay shirbhate in the race of mayor’s post : विलास इंगोले गटनेते, महापौरपदासाठी प्रा. संजय शिरभाते मैदानात

Amravati महापालिका २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षाने संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग दिला आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या एकमताने माजी महापौर विलास इंगोले यांची पक्षाच्या गटनेतापदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विलास इंगोले हे प्रभाग क्रमांक १४ (जवाहरगेट–बुधवारा) येथून सलग सातव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून, त्यांचा महापालिकेतील प्रदीर्घ अनुभव काँग्रेससाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस नगरसेवकांच्या गटात एकसंघता आणि मजबुती येईल, असा विश्वास काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल नवनिर्वाचित नगरसेवकांनीही समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

Akola municipal corporation : मतांचे गणित, तटस्थतेची खेळी आणि ऐनवेळी पलटी

दरम्यान, महापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रा. संजय शिरभाते यांनी नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस समविचारी आणि मित्र पक्षांसोबत आघाडी करून सक्षमपणे निवडणूक लढवणार असून, यासंदर्भात बोलणी सुरू असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.