Ajit Pawar group’s ‘jumbo’ executive committee announced : प्रशांत डवरे यांच्या अध्यक्षतेत ३४ उपाध्यक्ष, ५७ सचिव, संघटक सचिव, ६२ सरचिटणीस
Amravati आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार)अमरावती शहर जिल्ह्यासाठी नवी ‘जंबो’ कार्यकारिणी जाहीर केली आहे. शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारिणीत ३४ उपाध्यक्ष, ५७ सचिव, ३८ संघटक सचिव, ६२ सरचिटणीस आणि १७ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.
प्रभाग अध्यक्षांचीही घोषणा
अमरावती महापालिकेच्या सर्व २२ प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने २२ प्रभाग अध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे.
Narendra Modi : नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेशनचे लोकार्पण मोदींच्या हस्ते
उपाध्यक्षपदी हे चेहरे
पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून भोजराज काळे, जितेंद्रसिंह ठाकूर, रतन डेंडुले, भूषण बनसोड, सपना ठाकूर, मनीष बजाज, जयश्री मोरे, अजय दातेराव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.
Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषदेकडून सरकारच्या निर्देशांना केराची टोपली
शहर प्रवक्ते आणि सेल प्रमुखांची नियुक्ती
शहर प्रवक्ते म्हणून अविनाश मार्डीकर, ॲड. किशोर शेळके, प्रा. सनाउल्ला खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध सेल प्रमुखांमध्ये –
ओबीसी सेल: दिलीप शिरभाते
अल्पसंख्याक सेल: साबीर खान हमजा खान
व्हीजेएनटी सेल: विनाश बोबडे
अनुसूचित जाती सेल: मंगेश मनोहरे
बडनेरा विभाग प्रतिनिधी: भास्कर ढेवले
प्रसिद्धी प्रमुखपदी अमित तायडे व चेतन ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.