Sachin Ghaiwals criminal record, demands for resignation : सचिन घायवळच्या गुन्हेगारी कुंडलीसह राजीनाम्याची मागणी
Mumbai : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याकडून गुन्हेगारीला अभय दिल्याचा दावा केला आहे. अंधारे यांनी म्हटलं आहे की, मंत्री योगेश कदम यांनी कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला, सचिन बन्सीलाल घायवळला शस्त्र परवाना दिला असून हा निर्णय कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कदम यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचं सांगत त्यांनी तात्काळ गृहराज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमधून हा मुद्दा उचलून धरला आहे. त्या म्हणाल्या की, कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर केवळ खुनाचेच नव्हे तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी विशेष अहवाल सादर करून अशा व्यक्तीला शस्त्र परवाना देऊ नये, अशी शिफारस केली होती. तरीदेखील योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून त्याला शस्त्र परवाना मंजूर केला.
OBC hostel : ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी तत्काळ जागा शोधा
अंधारे यांनी पुढे म्हटले की, योगेश कदम यांनी पदाचा गैरवापर करत गुंडाला संरक्षण दिले आहे. हे थेट गुन्हेगारीला बळ देण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
त्यांनी सचिन घायवळविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहितीही जाहीर केली आहे. कोथरूड पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 118/2010 भारतीय दंड विधान कलम 143, 147, 148, 149, 307, 427, 428 सह शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3, 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135, 142 अन्वये गुन्हा दाखल.
Local Body Elections : बुलढाणा, खामगाव, चिखलीत ‘हायप्रोफाइल’ लढत?
दत्तवाडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 82/2010 – कलम 120, 302, 307, 343, 147, 148, 149 सह शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3, 4, 25 आणि मोक्का कलम 3(1)(1), 3(1)(2), 3(4) अंतर्गत गुन्हा नोंद. शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 3082/2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अंतर्गत गुन्हा नोंद असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
या सर्व गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सचिन घायवळला शस्त्र परवाना देणे म्हणजे गुन्हेगारीला पाठबळ देणे असल्याचा अंधारे यांचा आरोप आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, हे प्रकरण केवळ शस्त्र परवाना देण्यापुरते मर्यादित नाही, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारे आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : शेतकऱ्यांसाठी ठाकरे सेना रस्त्यावर, सरकारवर हल्ला
दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सचिन घायवळ यांनी शिक्षक आणि व्यावसायिक या नात्याने माझ्याकडे शस्त्र परवाना अपील प्रकरण दाखल केले होते. त्या वेळी पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. तसेच न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केल्याचा आदेश उपलब्ध होता. त्यावर आधारितच नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
कदम यांनी पुढे सांगितलं की, सध्या चर्चेत असलेल्या इतर प्रकरणांशी या अपीलाचा काहीही संबंध नाही. माझ्यावर लावलेले आरोप दिशाभूल करणारे असून माझ्या कारवाईत कुठलाही गैरप्रकार झालेला नाही.
Attack on CJI : त्या वकिलावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जिल्हा संघटनेची मागणी
तथापि, या वादामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाने मंत्री कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करण्याची तयारी सुरू केली आहे. आता या प्रकरणावर सरकारची भूमिका काय राहते आणि गृहराज्यमंत्री कदम यांच्यावर पुढील कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_____